मोहोळ तालुक्यातील पापारी गावात राहणारे महादेव तुकाराम सावंत यांनी 3 वर्षांपूर्वी एका एकरामध्ये उमरान आणि चमेली या बोरांच्या झाडांची लागवड केली आहे. एका एकरात जवळपास 300 पेक्षा अधिक झाडांची लागवड केली आहे. उमरान आणि चमेली बोरांच्या झाडांची लागवड केल्यानंतर एका वर्षांनी छाटणी करून घेतली, त्यानंतर शेणखत टाकून घेतलं.
advertisement
झाडांवर रोग पडू नये यासाठी दहा दिवसाला फवारणी करून घेतली. उमरान आणि चमेली बोरांच्या लागवडीसाठी एका एकराला 50 ते 70 हजार रुपयांचा खर्च महादेव सावंत यांना आला आहे. तर खर्च वजा करून 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे.
सध्या उमरान आणि चमेली बोरांना 35 ते 40 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. तर या बोरांची तोडणी करून पापरी गावातील शेतकरी महादेव सावंत हे मुंबई येथे विक्रीसाठी पाठवत आहेत. आतापर्यंत 100 पेक्षा अधिक बोरांचे गोणे विक्री केले आहेत. शेतकऱ्यांनी उमरान आणि चमेली बोराच्या बागेचे योग्य नियोजन कमी खर्चातून अधिक उत्पन्न घेता येईल, असा सल्ला शेतकरी महादेव सावंत यांनी दिला आहे.





