पिक विम्याबाबत माणिकराव काय म्हणाले?
पिक विम्यात गैरप्रकार होत असल्याचे समोर आले होते. पिक विमा घोटाळ्याच्या परिणामी ही योजनाच बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चा कृषी मंत्र्यांनी फेटाळून लावल्या. माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, सरकारला पिक विमा योजना बंद करायची नाही. परंतु या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागेल काही निर्णय घ्यावे लागतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. जो काही निर्णय घ्यावा लागेल त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बसून चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परंतु पिक विमा योजना ही बंद होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
advertisement
पिक विमा योजनेची पुनर्रचना होणार?
पिक विमा योजनेची पुनर्रचना होणार असल्याचे संकेत माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की या विमा योजनेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कशामुळं काही लोक गैरफायदा घेतात कंपन्या देखील लूटमार करतात. त्यामुळे निकष बदलले जाणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले. अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही. एक वेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात विमा देता येणार नाही हे देखील माणिकराव कोकाटे असेही त्यांनी स्पष्ट केले.
