Pik Vima Yojana : ''भिकेत एक रुपया घेत नाही, पण आम्ही पिक विमा दिला'', कृषी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

Last Updated:

Pik Vima Yojana Manikaro Kokate : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला असल्याचे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. अमरावती येथील एका कार्यक्रमाच्या वेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

News18
News18
संजय शेंडे, प्रतिनिधी, अमरावती: राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पिक विम्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विचार केला तर भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. पण आम्ही एक रुपयामध्ये पिक विमा दिला असल्याचे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. अमरावती येथील एका कार्यक्रमाच्या वेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, विचार केला तर भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही मात्र एक रुपयांमध्ये पिक विमा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न लोकांनी केला. असा गैरप्रकार केला की बाकी राज्यातील लोकांनी देखील ऑनलाईन अर्ज केले. त्यातून असं वाटते की ही पिक विमा खूपच चांगली आहे की काय आम्ही जेव्हा चौकशी केली. त्यातून सत्य कळल्यानंतर आम्ही अर्ज नामंजूर केले असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. पिक विमा योजना ही यशस्वी झाली पाहिजे योग्य त्या शेतकऱ्याला ती योजना मिळाली पाहिजे. यातले फायदे-तोटे हे चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
advertisement

पिक विमा योजना बंद होणार?

माणिकराव कोकाटे यांनी म्हटले की, सरकारला पिक विमा योजना बंद करायची नाही. परंतु या योजनेत होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावे लागेल काही निर्णय घ्यावे लागतील असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. जो काही निर्णय घ्यावा लागेल त्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बसून चर्चा करून निर्णय घेतला जाईल. परंतु पिक विमा योजना ही बंद होणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
advertisement
या विमा योजनेमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. कशामुळं काही लोक गैरफायदा घेतात कंपन्या देखील लूटमार करतात. त्यामुळे निकष बदलले जाणार असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.
अल्पभूधारक शेतकऱ्याला एक रुपयात विमा आणि इतर शेतकऱ्यांना शंभर रुपये विमा असा निर्णय घेता येणार नाही. एक वेळी पिकाप्रमाणे विमा आकारता येईल परंतु एकाला शंभर रुपयात आणि एकाला एक रुपयात विमा देता येणार नाही हे देखील माणिकराव कोकाटे असेही त्यांनी स्पष्ट केले.
advertisement

कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर कायम राहणार...

कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरबाबत माणिकराव कोकाटे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. अनेक वेळा कृषी विभागातील अधिकारी बदलून जातात व त्यांचे वारंवार मोबाईल नंबर बदलतात. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. त्यांच्या संपर्कासाठी आता कृषी विभागाने निर्णय घेतला आहे की कृषी विभागामध्ये एका सीरिजचे नंबर सर्व अधिकाऱ्यांना देण्याचा कृषी विभागाचा विचार आहे. हे मोबाईल फोन क्रमांक एक व्यक्ती म्हणून जाणार नाही तर ते नंबर पदनिहाय दिले जाणार आहे. यामध्ये मंत्र्यापासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंतचे नंबर हे कायमस्वरुपी राहतील. हे मोबाईल क्रमांक कोणत्याही व्यक्तीच्या नावावर दिले जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pik Vima Yojana : ''भिकेत एक रुपया घेत नाही, पण आम्ही पिक विमा दिला'', कृषी मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement