Pune Water News : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात मोठी जलवाहिनी फुटली! या' भागांना पाणी मिळणार नाही
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Water Supply Disrupted : चिंचवड गावातून थेरगावला जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटलच्या भागात एक हजार मिमी व्यासाची पाणीपुरवठा वाहिनी फुटली. त्यामुळे काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पूजा सत्यवान पाटील प्रतिनिधी पुणे
पुणे : चिंचवडहून थेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर बिर्ला हॉस्पिटलजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अचानक पाणी बंद झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या जलविभागाने दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू केलं असून, आज काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या भागातील पाणीपुरवठा बंद
चिंचवडगावातून थेरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बिर्ला हॉस्पिटल परिसरात काल सायंकाळी मुख्य जलवाहिनी फुटल्याने परिसरात पाण्याचे फवारे उडाले.ही जलवाहिनी फुटल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी देखील झाली आहे. या जलवाहिनीमार्फत थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर आणि रहाटणी या भागांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, त्यासाठी संबंधित भागात तात्पुरता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
advertisement
जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आज पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता आहे. या दुरुस्तीमुळे थेरगावपासून पिंपळे निलखपर्यंतच्या भागात पाणी तात्पुरते विस्कळीत राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी काळजीपूर्वक वापरावे आणि बचत करावी, असे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता यांनी आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 8:30 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Water News : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! शहरात मोठी जलवाहिनी फुटली! या' भागांना पाणी मिळणार नाही


