या योजनेतून देशातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचे अनुदान तीन हप्त्यांमध्ये दिले जाते. आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20 व्या हप्त्यासाठी लाखो शेतकरी प्रतीक्षेत आहेत. याबाबत अनेकदा 18,19 किंवा 20 जुलैला हफ्ता येईल, असा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या तारखा पार गेल्यानंतरही हफ्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
advertisement
सरकारचं स्पष्ट आवाहन
या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचं आवाहन केलं आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे की, सोशल मीडियावर पीएम किसान योजनेच्या नावाखाली बनावट संदेश, लिंक, कॉल्स आणि अफवा पसरवल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावं आणि अशा बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये.
फक्त अधिकृत पोर्टल आणि अकाउंटवरच विश्वास ठेवा, असं आवाहन करताना मंत्रालयाने सांगितलं की, 20 व्या हप्त्याची कोणतीही माहिती केवळ http://pmkisan.gov.in या पोर्टलवर किंवा @pmkisanofficial या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरच दिली जाईल.
शेतकऱ्यांनी माहिती कशी मिळवायची?
आपला लाभार्थी स्टेटस तपासण्यासाठी http://pmkisan.gov.in वर जाऊन 'Beneficiary Status' वर क्लिक करावं. आधार क्रमांक, मोबाइल नंबर किंवा बँक खाती यामध्ये योग्य माहिती भरून तपशील पाहता येतो. मोबाइलवर आलेले कोणतेही बनावट लिंक, OTP मागणारे मेसेज किंवा बँक तपशील विचारणारे कॉल्स याकडे दुर्लक्ष करावं. आपल्या बँक खात्यावर पैसे जमा झालेत का हे तपासण्यासाठी बँक खात्याची नियमित तपासणी करावी.
हफ्त्याबाबत लवकरच घोषणा अपेक्षित
20 व्या हप्त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा आणि खात्रीलायक स्रोतांवरूनच माहिती घ्यावी.
दरम्यान, पीएम किसान योजनेचा 20 वा हफ्ता अजून जाहीर झालेला नाही, पण सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांना बळी न पडता, अधिकृत संकेतस्थळावर माहिती तपासावी, असं केंद्र सरकारचे आवाहन आहे. शेतकऱ्यांचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी ही काळजी अत्यावश्यक ठरत आहे.