Success Story : 30 रुपयांच्या शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणले, पण काहींनी या संधीचं सोनं केलं. अशाच तरुण उद्योजकांपैकी एक म्हणजे प्रणय ठसाळ.
मुंबई: लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्यात बदल घडवून आणले, पण काहींनी या संधीचं सोनं केलं. अशाच तरुण उद्योजकांपैकी एक म्हणजे प्रणय ठसाळ, जोगेश्वरी येथील रहिवासी. पूर्वी पेशाने जिम ट्रेनर असलेला प्रणय, आज ‘रॅपअप शोरमा’ या नावाने स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहे.
लॉकडाऊनपूर्वी प्रणय तब्बल सहा ते आठ वर्षे जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. मात्र, कोरोनाच्या काळात जिम बंद झाल्याने त्याची नोकरी गेली. पण हार न मानता त्याने स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. पालकांच्या पाठिंब्याने प्रणयने शोरमाचा स्टॉल सुरू केला. त्याच्या वडिलांनीदेखील नोकरी सोडून मुलाला साथ दिली आणि इथूनच ‘रॅपअप शोरमा’चा प्रवास सुरू झाला.
advertisement
अंधेरी परिसरात फक्त 30 रुपयांपासून सुरू केलेल्या शोरमाने लोकांची मनं जिंकली. शाळकरी मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांनाच हा शोरमा परवडणारा आणि स्वादिष्ट वाटला. वाढत्या प्रतिसादामुळे प्रणयने नंतर जोगेश्वरीत आपल्या घराजवळच एक लहानसा गाळा घेतला आणि दुकान सुरू केले.
advertisement
आज ‘रॅपअप शोरमा’मधून प्रणयला महिन्याला दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. त्याच्या दुकानातील सर्व साहित्य भाज्या, सॉस, मसाले तो फ्रेश आणि नैसर्गिक पद्धतीने तयार करतो. कोणतेही हानिकारक केमिकल्स किंवा कृत्रिम पदार्थ न वापरता तो आरोग्यदायी शोरमा देण्याचा प्रयत्न करतो.
प्रणयचं म्हणणं आहे, जिद्द आणि मेहनत असेल तर कोणतीही अडचण पार करता येते. त्याचा हा आत्मनिर्भरतेचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 6:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 30 रुपयांच्या शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!