झोपडपट्टीत राहिला, रस्त्यावर भीक मागितली, आईच्या एका सल्ल्याने बदललं नशीब; 'या' कॉमेडियनच्या टॅलेंटसमोर बॉलिवूडही नतमस्तक

Last Updated:
Comedian Untold Story : बॉलीवूडमधील असे एक अभिनेते, ज्यांनी केवळ अभिनयच नव्हे, तर जबरदस्त डायलॉग्स आणि कथा लेखनातसुद्धा आपली छाप सोडली. कॉमेडी असो वा गंभीर भूमिका प्रत्येक पात्र त्यांनी जिवंत केलं.
1/7
 1. हिंदी चित्रपटसृष्टीत कितीही टॅलेंटेड अभिनेते आले तरी काही दिग्गज कलाकारांची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यापैकीच एक होते कादर खान. जेव्हा त्यांनी गंभीर भूमिका केल्या, तेव्हा प्रेक्षकांचे डोळे पाणावले, आणि जेव्हा विनोदी भूमिका केल्या, तेव्हा लोक हसून लोटपोट झाले. अभिनयासोबतच ते एक अफाट लेखक होते.

advertisement
2/7
 कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी अफगाणिस्तानमधील एका मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील अब्दुल रहमान खान अफगाणिस्तानी होते, तर आई इकबाल खान पाकिस्तानी होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांचे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाले. मुंबईच्या एका झोपडपट्टीत, केवळ दोन छोट्या खोल्यांमध्ये ते राहत होते. परिस्थिती इतकी वाईट होती की, झोपडपट्टीतील अस्वच्छतेमुळे कादर खान यांचे दोन भाऊ दगावले.

3/7
 घरातील परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या आई-वडिलांमध्ये सतत भांडण होई आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं. पण ते वडील मात्र त्यांच्याशी चांगले वागत नव्हते. एका मुलाखतीत कादर खान यांनी सांगितले होते की, त्यांचे वडिल त्यांना भीक मागायला लावायचे. पण कादर खान मात्र शिकायचं, मोठं होण्याचं स्वप्न पाहत होते. त्यांची आई त्यांना शिकवू इच्छित होती. त्यांना मोठं ऑफिसर बनवायचं आणि स्वत:च्या पायावर उभं राहायला लावायचं हे त्यांच्या आईचं स्वप्न होतं.

4/7
 आईच्या मृत्यूनंतरही त्यांनी हार मानली नाही. शासकीय शाळेत शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी इस्माईल युसुफ कॉलेज मधून शिक्षण घेतलं आणि नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग केली. ते पुढे प्राध्यापक सुद्धा झाले. शिक्षणासोबतच ते थिएटरमध्ये काम करत असत.

5/7
 कॉलेजमध्ये होणाऱ्या नाटकांचे लेखन आणि आयोजन ते स्वतः करत असत. एकदा एका नाटकात मुख्य अभिनेता अनुपस्थित राहिला. कादर खान यांनी स्वतः ती भूमिका केली आणि त्या नाटकाचे प्रमुख पाहुणे होते सुपरस्टार दिलीप कुमार. दिलीप कुमार यांना कादर खान यांचं काम आवडलं. त्यांनी कादर खान यांना त्यांच्या 'सगीना' आणि 'बैराग' या दोन चित्रपटांसाठी संवाद लेखनाची संधी दिली. त्यानंतर 'जवानी दिवानी' यासाठीसुद्धा त्यांनी लेखन केलं. 1973 मध्ये 'दाग' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

6/7
 कादर खान यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. अभिनयासोबतच त्यांनी संवाद लेखन आणि पटकथा लेखन हे काम देखील केले. विनोदी भूमिकांपासून ते खलनायक, वडील, शिक्षक अशा अनेक भूमिका त्यांनी गाजवल्या.

7/7
 कादर खान यांना 2018 मध्ये बोलण्यासही त्रास होऊ लागला होता. 2005 नंतर त्यांनी जवळपास काम करणं बंद केलं. 28 डिसेंबर 2018 रोजी, कनाडामधील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा उपचारासाठी त्यांना तिथे घेऊन गेला होता. कादर खान यांचं अंत्यसंस्कार कनाडामधील मुस्लिम कब्रस्तानात करण्यात आले.

Bollywood Movies: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
: हिरोच बनला खलनायक, बॉक्स ऑफिसवर उडवली खळबळ; तिन्हीही ठरले ब्लॉकबस्टर
    View All
    advertisement