गुंड घायवळच्या भावाशी कनेक्शन, गृहराज्यमंत्री कदम यांनी शस्त्र परवाना दिला; धक्कादायक माहिती समोर

Last Updated:

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Ghywal Gang
Ghywal Gang
पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. त्यामागचं कारण म्हणजे सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सचिन घायवळनं गृहखात्याकडं अपिल केलं होतं. त्या अपिलानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्याचा आदेश दिला. 20 जून 2025 रोजी हा शस्त्र परवाना दिल्याचं कागदपत्रावरून समोर आलं आहे. न्यूज १८ लोकमतच्या हाती ती कगदपत्र लागली आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांचा विरोध डावलून परवाना दिला होता.

निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या

advertisement
राज्यभरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश घायवळच्या बनावट पासपोर्ट प्रकरणानंतर घायवळ बंधूंकडून व्यवस्थेला बटीक बनवण्याचा प्रकार समोर आला आहे. निलेश बन्सीलाल घायवळ याचा सख्खा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याच्यावर खुनाचा प्रयत्न , आर्म्स ॲक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना पुणे पोलिसांनी नाकारला असताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी २० जून २०२५ रोजी अधिकृत शस्त्रपरवाना दिल्याच उघड झाले आहे. घायवळ टोळीचा निलेश घायवळ याच्यानंतर सचिन घायवळ म्होरक्या आहे.
advertisement

गृहराज्यमंत्र्यांचे आदेशात नेमकं काय म्हंटलंय?

1) अपिलार्थीचा अपील अर्ज मंजूर करण्यात येत आहे
2 पोलीस आयुक्त, पुणे शहर दि.20 जानेवारी 2025चा आदेश रद्द करण्यात येत आहे
3) पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी अपिलार्थी यांना विहीत कार्यपद्धती अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील आवश्यक कारवाई करावी
योगेश कदम
राज्यमंत्री (गृह)(शहरे), महाराष्ट्र राज्य
advertisement

राज्याचे  गृहराज्यमंत्री रडारवर 

आठवडाभरापासून घायवळ प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. बनावट पासपोर्ट काढून घायवाळ परदेशात पळून गेल्यानंतर पुणे, अहिल्यानगर पोलिसांचे धाबे दणाणले होते, त्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे हे प्रकरण समोर आल्यानंतर गृहराज्यमंत्री रडारवर आले आहे. निलेश घायवाळनंतर त्याचा भाऊ योगेश घायवाळ हा टोळीचा म्होरक्या आहे. योगेश घायवळ असलेल्या गुन्ह्याची निर्दोष मुक्तता झाल्याचे सांगत त्याने पुणे पोलिसांकडे शस्त्रपरवान्यासाठी अर्ज केला. मात्र पुणे पोलिसांनी हा अर्ज तात्काळ फेटाळून लावला.
advertisement

अर्ज कसा मिळवला? 

पुणे पोलिसांनी अर्ज फेटाळल्यानंतर योगेश घायवाळ याने राज्याच्या गृहमंत्रालयाकडे अर्ज केला. व्यावसायिक कारणांसाठी मला रोख रक्क्म बाळगावी लागते, ती रक्कम मोठी असल्याने ती बाळगताना माझ्या जीवाला धोका आहे, त्यासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी असा अर्ज केला होता. त्यानंतर हे परवाना देण्याचे अर्ज देण्यात आले.
मराठी बातम्या/पुणे/
गुंड घायवळच्या भावाशी कनेक्शन, गृहराज्यमंत्री कदम यांनी शस्त्र परवाना दिला; धक्कादायक माहिती समोर
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement