Arthritis : बराच एका जागी बसणं टाळा, हाडं आणि सांध्यांसाठी आहे धोकादायक, अशी घ्या काळजी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तासन्तास बसून राहिल्यानं गुडघे आणि सांध्यात संधिवात होऊ शकतो. यामुळे पॅटेलोफेमोरल जॉइंट, बाउल बोनमधे समस्या येण्याचा धोका वाढतो. हाडं आणि सांधे निरोगी राखण्यासाठी, तुम्हाला नियमित व्यायामाची सवय लावावी लागेल.
मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेकांना कंबर, पाठदुखीचा त्रास जाणवत असतो. हा त्रास का होतो, त्याच्यासाठी उपचार उपलब्ध असले तरी ते रोखण्यासाठी आपण काय करु शकतो याविषयी जाणून घेऊया.
तासन्तास बसून राहिल्यानं गुडघे आणि सांध्यात संधिवात होऊ शकतो. यामुळे पॅटेलोफेमोरल जॉइंट, बाउल बोनमधे समस्या येण्याचा धोका वाढतो. हाडं आणि सांधे निरोगी राखण्यासाठी, तुम्हाला नियमित व्यायामाची सवय लावावी लागेल. यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं वजन नियंत्रणात ठेवणं.
आजच्या जीवनशैलीमुळे शारीरिक हालचाली तुलनेनं कमी होत आहेत. ऑफिसमध्ये किंवा घरी, सतत बसून राहिल्यानं मणक्यावर जास्त ताण येतो, ज्यामुळे संधिवात होण्याचा धोका वाढतो.
advertisement
वजन नियंत्रणात ठेवणं का महत्त्वाचं ते समजून घेऊया -
वजन नियंत्रणात ठेवल्यानं संधिवात होण्यापासून संरक्षण होईल. हाडं आणि सांधे निरोगी राखण्यासाठी, आहारात कॅल्शियमचा समावेश करा आणि दररोज अर्धा तास सूर्यप्रकाशात घालवण्याचा प्रयत्न करा. चालताना सांधेदुखी जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. बसणं हे संधिवात होण्याचं एकमेव कारण नाही; इतर अनेक घटक देखील संधिवात होण्यास कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
लहान वयातही हाडांच्या समस्या उद्भवतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि संतुलित दैनंदिन दिनचर्येचा अभाव यामुळे संधिवातासारख्या समस्या उद्भवू शकतात. सांध्यांच्या समस्या टाळण्यासाठी, बालपणापासूनच निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी आहाराची काळजी घेणं महत्वाचं आहे.
आहारात कॅल्शियम, प्रथिनं आणि व्हिटॅमिन डी आवश्यक आहेत. त्वचेवर सूर्यप्रकाश येणं आवश्यक आहे. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी, तुमच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. काही फळं, काजू आणि नाचणीसारखे संपूर्ण धान्य यासाठी आवश्यक आहे. सीताफळ हे यासाठी खूप उपयुक्त फळ आहे. प्रथिनांसाठी, मसूर, सोयाबीन, राजमा आणि दूध यांचा समावेश करा.
advertisement
संधिवाताची लक्षणं - संधिवाताची नेहमी जाणवणारी लक्षणं म्हणजे वेदना होणं आणि सूज येणं. समस्या वाढत असताना, चालताना आणि पायऱ्या चढायला त्रास होऊ शकतो. पाय वाकडे होऊ शकतात. यात पूर्ण सुधारणा शक्य नाही पण याला रोखण्याचा प्रयत्न करु शकता. हे साध्य करण्यासाठी, आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 6:31 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Arthritis : बराच एका जागी बसणं टाळा, हाडं आणि सांध्यांसाठी आहे धोकादायक, अशी घ्या काळजी