ई केवायसी अनिवार्य
जर तुम्हाला पीएम किसानचे पुढील हप्ते मिळवायचे असतील तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही अजून केवायसी केले नसेल तर ते लवकर करा. शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in ला भेट देऊन ई-केवायसी करू शकतात. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला पुढील हप्त्यांपासून वंचित ठेवले जाऊ शकते.
advertisement
अन्यथा हप्ता अडकणार
ई-केवायसी व्यतिरिक्त, तुमचे आगामी हप्ते इतर कारणांमुळे अडकू शकतात. तुम्ही भरलेल्या अर्जात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, चुकीचे लिंग, चुकीचे नाव, चुकीचा आधार क्रमांक किंवा चुकीचा पत्ता इ. तरीही तुम्हाला हप्त्यापासून वंचित ठेवले जाऊ शकते. याशिवाय, जर खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुम्हाला येणाऱ्या हप्त्यांपासूनही वंचित राहावे लागू शकते. अशा परिस्थितीत, पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि अर्जाच्या स्थितीवर दिलेली चुकीची माहिती दुरुस्त करा.
लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचे?
तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळेल की नाही हे जर तपासायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासू शकता.
यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.नंतर 'शेतकरी कॉर्नर' विभागात जा आणि लाभार्थी यादीवर क्लिक करा. पुढे जाऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या राज्याचे, जिल्हाचे, तहसीलचे आणि गावाचे नाव टाका. आणि Get Report बाटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला दिसणाऱ्या यादीत तुमचे नाव दिसेल.
तक्रार कशी नोंदवाल?
पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तसेच पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.