TRENDING:

Success Story : मराठवाड्यातील 2 भावांची कमाल, 10 गुंठ्यात केली स्ट्रॉबेरी शेती, 3 महिन्यांत 2 लाख कमाई

Last Updated:

दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात फुलवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज गावात दोन तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केला आहे. प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे पीक त्यांनी आपल्या शेतात फुलवले आहे. समाधान बलांडे आणि गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. येत्या काळात उत्पन्नात आणखी 2 लाखांची वाढ होईल, असा विश्वास बलांडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
advertisement

फुलंब्रीच्या बोरगाव अर्ज गावातील प्रगतशील शेतकरी गणेश बलांडे आणि गणेश बलांडे हे दोघे भाऊ मोबाईल पहात असताना अचानक स्ट्रॉबेरीची जाहिरात आली. ती जाहिरात पाहून आपणही स्ट्रॉबेरी पीक घ्यावं, असा विचार आला की महाबळेश्वर सारख्या ठिकाणी उत्पादन निघते तर मराठवाड्यात आपणही घेऊन बघण्याची कल्पना सुचली आणि महाबळेश्वरचे मित्र सतीश भापकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी बोलावले. त्यांच्याकडे असलेले आणि मराठवाड्यातील तापमानात सामावून जाईल अशा पद्धतीने स्ट्रॉबेरीचे वाण निवडायला सांगितले. विंटर डाऊन ही 35 डिग्री तापमान सहन करू शकते त्यामुळे या वाणाची निवड केली असल्याचे देखील गणेश बलांडे यांनी म्हटले आहे.

advertisement

Success Story : शिक्षण घेत असताना केली शेती, कांदा शेतीचा प्रवीणचा प्रयोग यशस्वी, वर्षाला 4 लाख नफा

विशेषतः स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेत असताना त्याची विक्री अजिंठ्याकडे जाणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना फुलंब्री गावातील रस्त्यावर करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांच्या कालावधीत 60 हजारांचा खर्च वजा जाता 2 लाख सरासरी निव्वळ नफा मिळाला आहे. सध्या रोज दहा किलो स्ट्रॉबेरी मिळत असून 400 रुपये किलोप्रमाणे दोघांना प्रत्येकी 2 हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पुढील चार महिने हे पीक चालणार आहे. तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड नसल्याने ताजी स्ट्रॉबेरी खरेदीसाठी जिल्ह्यातून ग्राहक फोनवर ऑर्डर देत आहेत. स्थानिक पातळीवरच फळ विकलं जात असल्याने त्यांचा वाहतूक खर्च वाचत आगामी काळात 1 एकरवर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचा दोन्ही शेतकऱ्यांचा मानस आहे.

advertisement

थंड हवामान नसतानाही स्ट्रॉबेरीचे पीक टिकवण्यासाठी बलांडे भावंडांनी विशेष तंत्रज्ञान वापरले. काळ्या मल्चिंगऐवजी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला. यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन उष्णता कमी झाली. रोपांच्या खाली बारीक कुट्टीचा चारा अंथरून मातीला थंडावा दिला. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून पाने सुकून काळे पडणे आणि पिवळेपणा येणे असे टाळणे शक्य होणार असल्याचे देखील समाधान बलांडे यांनी म्हटले आहे.

advertisement

स्ट्रॉबेरी लागवड कशी करावी?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नव्या वर्षात शनिची साडेसाती, 3 राशीवाले चुका महागात पडणार, कोणती सावधगिरी बाळगाल
सर्व पहा

बलांडे यांनी महाबळेश्वरहून दहा रुपये प्रतिरोप दराने पाच हजार रोपे विकत घेतली. लागवडीसाठी 60 हजार खर्च आला. चार फूट रुंदीचे बेड तयार करून एक फूट अंतरावर रोपे लावली. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. रोज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान स्ट्रॉबेरी तोडून अर्धा किलो आणि एक किलोचे बॉक्स तयार केले जातात. हे बॉक्स 400 रुपये दराने विकले जात आहेत. स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर फार काळ देखभाल करावी लागत नाही. पिकाला सिंचन, खतांची योग्य मात्रा द्यावी लागते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Success Story : मराठवाड्यातील 2 भावांची कमाल, 10 गुंठ्यात केली स्ट्रॉबेरी शेती, 3 महिन्यांत 2 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल