Krushi Market Rate: थंडीचा जोर वाढला अन् तीळ- गुळाचेही भाव वाढले, आजचा दर किती?
- Reported by:Priti Nikam
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
बुधवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
मुंबई: बुधवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
गुळाची मागणी वाढली: राज्याच्या मार्केटमध्ये 2393 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 1910 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये 335 क्विंटल आवक झालेल्या गुळास प्रतीनुसार 4301 ते 4425 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 1967 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 902 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3600 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 45 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 3000 ते 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळास चांगला उठाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 294 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 210 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल पांढर्या तीळास 8000 ते 9000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
Location :
Maharashtra
First Published :
Dec 17, 2025 9:14 PM IST








