छत्रपती संभाजीनगर: सध्याच्या काळात मराठवाड्यातील काही शेतकरी देखील आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत केलेल्या या प्रयोगांमुळे त्यांची भरघोस कमाई देखील होतेय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संतोष वाघमारे यांनी देखील असाच एक प्रयोग आपल्या शेतात केला आहे. रेशीम शेतीतून ते लाखोंची कमाई करत आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथे संतोष वाघमारे यांची शेती आहे. पदव्युत्तर पदवीपर्यंतचं उच्च शिक्षण घेतल्यानंतर संतोष यांनी परंपरागत शेतीकडेच वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक शेती परवडत नसल्याने शेतात वेगळा प्रयोग करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत माहिती घेऊन 2010 मध्ये प्रत्यक्ष रेशीम शेतीस सुरुवात केली. परंतु, त्यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होता. रेशमाच्या आळ्या पाळणे कुटुंबीयांना मान्य नव्हतं, असं संतोष सांगतात.
बँकेच्या टार्गेटला वैतागून नोकरी सोडली, एक-दोन करत 50 कोंबड्या जमवल्या, आता कितीची कमाई?
सुरुवातीला संतोष यांनी घरातील एका छोट्या रूम मधून 500 रुपयांची अंडी पुंजी घेऊन त्यातून सुरुवात केली. त्यांनी घेतलेल्या 500 रुपयांच्या अंडीपूंजी मधून त्यांना 2010 साली 200 हजार उत्पन्न भेटलं. कमी खर्चात जास्त उत्पन्न भेटत असल्याने पुढे कुटुंबीयांचा विरोध मावळला. तसेच त्यांनी सुद्धा रेशीम शेतीला परवानगी दिली. आता संतोष वाघमारे हे कुटुंबीयांसह रेशीम शेती करत आहेत.
संतोष वाघमारे यांचा चॉकी सेंटर देखील आहे. यातून ते अनेक शेतकऱ्यांना चॉकी देतात. रेशीम शेती आणि चॉकी सेंटर मधून त्यांना दुहेरी उत्पन्न मिळतेय. तसेच संतोष यांनी आपल्या व्यवसायातून रोजगार देखील दिला आहे. त्यांच्याकडे काम करण्यासाठी 7 ते 8 महिला कामगार आहेत. संपूर्ण वाघमारे कुटुंब आज ही रेशीम शेती करत असून त्यांना 2 लाखांपर्यंतचं उत्पन्न मिळत असल्याचंही संतोष यांनी सांगितलं.





