TRENDING:

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! GST मध्ये बंपर सूट, काय स्वस्त होणार?

Last Updated:

GST Impact on Farmer: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणात केलेल्या घोषणेनंतर केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजीच्या भाषणात केलेल्या घोषणेनंतर केंद्र सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केली आहे. या निर्णयामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राशी संबंधित उत्पादनांवरही दिलासा मिळणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की 12% आणि 18% जीएसटी दर रद्द करून त्याऐवजी 5% दर लागू करण्यात येणार आहे.
Agriculture News
Agriculture News
advertisement

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शेतीसाठी लागणाऱ्या विविध साधनांवरील करदर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या सुधारित साधने खरेदी करणे अधिक सोयीस्कर होणार असून त्याचा थेट फायदा त्यांच्या उत्पादनक्षमतेला होईल.

काय स्वस्त होणार?

ट्रॅक्टर व त्याचे टायर, ट्यूब आणि सुटे भाग : यावरील करदर 18% वरून थेट 5% करण्यात आला आहे. ट्रॅक्टरवरील जीएसटीदेखील पूर्वी 12% होता, जो आता 5% झाला आहे.

advertisement

जैविक कीटकनाशके आणि सूक्ष्म पोषक घटक : यावरील जीएसटी 12% वरून कमी करून फक्त 5% करण्यात आला आहे.

ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलर यंत्रणा : या आधुनिक सिंचन साधनांवरही 12% ऐवजी फक्त 5% कर आकारला जाईल.

माती तयार करणे, मशागत करणे, कापणी आणि मळणीसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री : कृषी, बागायती आणि वनीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांवरील जीएसटी देखील आता 5% वर आणला गेला आहे.

advertisement

खर्चात बचत, उत्पादनात वाढ

या निर्णयामुळे कृषी उपकरणे व यंत्रसामग्री स्वस्त होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च घटेल आणि त्यांना आधुनिक शेती पद्धती स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. उपकरणांच्या खर्चात झालेली कपात उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न उंचावण्यासाठी थेट मदत करणार आहे.

उत्पन्नात वाढ होणार?

अर्थतज्ज्ञांचे मत आहे की जीएसटी दरातील ही कपात देशातील ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणार आहे. खर्च कमी झाल्यामुळे शेतकरी आधुनिक साधनांचा वापर वाढवतील, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि ग्रामीण भागातील आर्थिक क्रियाशीलता सुधारेल. यामुळे ग्रामीण बाजारपेठाही सक्षम होईल.

advertisement

सर्वांगीण विकासाकडे वाटचाल

सरकारचा हा निर्णय केवळ कर कपात नसून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा एक टप्पा मानला जात आहे. यामुळे शेती अधिक फायदेशीर होण्याबरोबरच शेतकऱ्यांची जीवनशैली सुधारेल. तज्ञांच्या मते, या पावलामुळे देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल आणि कृषी क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण होईल.

मराठी बातम्या/कृषी/
मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! GST मध्ये बंपर सूट, काय स्वस्त होणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल