आर्थिक सहाय्य
मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना ४ लाख रुपये. डोळे किंवा अवयव निकामी झाल्यास ४०-६०% अपंगत्वासाठी ७४,००० रु तर ६०% पेक्षा अधिक अपंगत्वासाठी २.५० लाख रु. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात उपचार घेतल्यास १६,००० आणि एक आठवड्यापेक्षा कमी असल्यास ५,४०० रु मदत.
घरांच्या नुकसानीसाठी मदत
पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी सपाट भागात १.२० लाख,तर डोंगराळ भागात १.३० लाख रु. अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांसाठी ६,५०० आणि कच्च्या घरांसाठी ४,००० रुपये. झोपडीसाठी ८,००० आणि गोठ्यासाठी ३,००० देण्यात येणार आहेत.
advertisement
जनावरांसाठी
दुधाळ जनावरासाठी ३७,५०० रु
ओढकाम जनावरासाठी ३२,००० रु
लहान जनावरासाठी २०,००० रु
शेळी/मेंढीप्रमाणे ४,००० रु आणि प्रत्येक कोंबडीसाठी १०० रु मदत.
शेती पिकांचे नुकसान
जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टर ८,५०० रु
बागायत पिकांसाठी प्रतिहेक्टर १७,००० रु
बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टर २२,५०० रु
शेतजमीन नुकसान भरपाई
गाळ काढण्यासाठी प्रतिहेक्टर १८,००० रु
दरड कोसळणे, जमीन खचणे किंवा वाहून जाणे अशा स्थितीत अल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४७,००० रु मदत दिली जाईल.
इतर सवलती आणि सुविधा
जमीन महसुलात सूट.
सहकारी कर्जांचे पुनर्गठन.
शेतीशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्ज वसुलीला एक वर्षाची स्थगिती.
तिमाही वीज बिलात माफी.
विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात सूट.
मदत वितरण सुरू
''पहिला टप्पा निधी आधीच वितरित करण्यात आला असून, दुसरा टप्पा तात्काळ दिला जाणार आहे''. असही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले