अशी राहिली मका आवक
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 12 हजार 247 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 4 हजार 213 क्विंटल सर्वाधिक लाल मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1310 ते जास्तीत जास्त 1698 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल मक्यास सर्वाधिक 2225 रुपये बाजारभाव मिळाला. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 35 क्विंटल पिवळ्या मक्यास 1283 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
Success Story : 50 गुंठ्यांमध्ये 450 झाडांची लागवड, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न, असं काय केलं?
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये कांद्याची 1 लाख 33 हजार 522 क्विंटल कांद्याची उच्चांकी आवक झाली. यापैकी 62 हजार 017 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 2000 क्विंटल पांढऱ्या कांद्यास प्रतीनुसार 1400 ते 2000 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला.
सोयाबीनचे दर दबावतच
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 81 हजार 299 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 28 हजार 146 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3493 ते 4250 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच हिंगोली मार्केटमध्ये आवक झालेल्या 305 क्विंटल सोयाबीनला 3900 ते 4300 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये 11 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3000 हजार रुपये सर्वात कमी बाजार भाव मिळाला.
सोयापेंड निर्यातीची मागणी
सोयाबीनच्या दरावर थेट परिणाम करणारा घटक म्हणजे सोया पेंडचा बाजारभाव. या दरातील चढउतारामुळे सोयाबीनची किंमतही बदलते. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, सरकारने सोया पेंडच्या निर्यातीस प्रोत्साहन द्यावे, म्हणजे शेतकऱ्यांना जास्त दर मिळतील, मात्र केंद्र सरकारच्या स्तरावर अद्याप या मागणीचा विचार झालेला नाही.