योजनेमागील उद्देश
पारंपरिक पद्धतीने हाताने चारा कापताना मोठा वेळ जातो आणि मेहनतही जास्त लागते. शिवाय हाताला इजा होण्याची शक्यता असते. मशीनच्या वापरामुळे चारा सहज, जलद आणि सुरक्षितरीत्या कापता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होऊन त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. या योजनेमागचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक कार्यक्षम बनवणे आणि पशुपालनाला चालना देणे.
advertisement
शेतकऱ्यांसाठी फायदे
कडबा कुट्टी मशीनमुळे चारा पटकन बारीक कापला जातो.
जनावरे चारा पूर्ण खातात, त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते.
मशीनमुळे शेतकऱ्यांचा वेळ, मेहनत आणि पैसा तिन्ही गोष्टींची बचत होते.
सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळाल्यामुळे यंत्र खरेदी परवडणारी ठरते.
चारा व्यवस्थापन सुधारल्यामुळे पशुसंवर्धनाला थेट चालना मिळते.
योजनेच्या अटी
अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी शेतकरी किंवा पशुपालक असावा. अर्जदाराकडे किमान दोन जनावरे असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे बंधनकारक आहे. मुंबई व मुंबई उपनगरातील अर्जदारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच यापूर्वी याच योजनेतून अनुदान घेतलेले नसावे. एखाद्या यंत्रासाठी अनुदान घेतले असल्यास, पुढील 10 वर्षे त्याच यंत्रासाठी अर्ज करता येणार नाही. अनुदानासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धत लागू राहील.
आवश्यक कागदपत्रे कोणते?
शेतकरी ओळखपत्र
आधार कार्ड व बँक पासबुकची प्रत (आधार लिंक असलेले)
यंत्राचे कोटेशन
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र
अर्ज प्रक्रिया कशी कराल?
शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन मार्गांचा वापर करू शकतात जसे की,
कृषी विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करणे. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असते.
अर्ज भरताना सर्व माहिती अचूक देणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडल्यावर कृषी विभागाचे अधिकारी पडताळणी करतात. एकदा पडताळणी पूर्ण झाली की, अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.