विक्री करार
विक्री करार म्हणजे मालमत्ता खरेदी-विक्रीचा मूळ कायदेशीर दस्तऐवज. हा दस्तऐवज मालकी हस्तांतरणाचा अधिकृत पुरावा असतो. विक्री करारात मालमत्तेची संपूर्ण माहिती, किंमत, अटी व शर्ती स्पष्ट नमूद असतात. विक्रेत्याकडे मूळ विक्री करार असल्याची खात्री करा आणि दस्तऐवज नोंदणीकृत असल्याची पुष्टी करा.
टायटल डीड
हा दस्तऐवज मालकी हक्क सिद्ध करतो. टायटल क्लियर आहे का? याची खात्री करून घ्या.कोणत्याही न्यायालयीन वाद, कर्ज किंवा बंधनामुळे अडचण तर नाही ना, हे वकिलाच्या साहाय्याने तपासा.
advertisement
मदर डीड
ही दस्तऐवज मालमत्तेच्या मूळ इतिहासाची माहिती देते. या दस्तऐवजातून मालमत्तेच्या पूर्वीच्या सर्व व्यवहारांची साखळी तपासता येते. विक्रेत्याकडे ही माहिती उपलब्ध आहे का? हे तपासून घ्या.
वारस प्रमाणपत्र
जर मालमत्ता वारसाहक्काने हस्तांतरित झाली असेल, तर हे प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.
मृत व्यक्तीच्या वारसांमध्ये मालमत्तेचा कायदेशीर हक्क कोणाला आहे, हे यातून स्पष्ट होते.
मृत्युपत्र
जर मालमत्ता मृत्युपत्राद्वारे हस्तांतरित झाली असेल, तर हे दस्तऐवज तपासणे आवश्यक आहे.मृत्युपत्र न्यायालयाने वैध ठरवलेले आहे का, याची खात्री करा. काही वेळा मृत्युपत्रावरून वाद उद्भवू शकतो, त्यामुळे वकिलाचा सल्ला घेणे योग्य.
इतर आवश्यक कागदपत्रे
7/12 उतारा व 8-अ उतारा (ग्रामीण भागासाठी)
प्लॅन मंजुरी प्रमाणपत्र (विशेषतः शहरी भागात फ्लॅट किंवा बांधकामासाठी)
बांधकाम परवानगी / संमतीपत्र
टॅक्स पावती, वीजबिल, पाणीपट्टी यांचे जुने रेकॉर्ड
दरम्यान, घर किंवा जमीन खरेदी करताना उत्साहापेक्षा सावधगिरी आणि कागदपत्रांची काटेकोर तपासणी अधिक महत्त्वाची आहे. खरेदीपूर्वी अनुभव असलेल्या वकिलाची मदत घ्या. आवश्यक सर्व कागदपत्रांची छाननी करा.फसवणूक टाळण्यासाठी व्यवहार फक्त नोंदणीकृत करारावर करा. अशा काळजीपूर्वक पद्धतीने व्यवहार केल्यास तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील आणि भविष्यातील कायदेशीर त्रास टाळता येईल.