मालमत्ता नोंदणी का गरजेची आहे?
कोणतीही मालमत्ता खरेदी-विक्री करताना ती कायद्यानुसार नोंदणी करणे अत्यावश्यक असते. नोंदणी केल्याशिवाय मालकी हक्क वैध मानला जात नाही. नोंदणीसाठी खरेदीदार आणि विक्रेत्याच्या उपस्थितीव्यतिरिक्त, दोन साक्षीदारांची उपस्थिती अनिवार्य असते. याशिवाय नोंदणी प्रक्रिया पूर्ण होत नाही.
साक्षीदार कोण असू शकतो?
नोंदणी प्रक्रियेत साक्षीदाराचे काम म्हणजे व्यवहाराची साक्ष देणे, की सर्व अटी पारदर्शकपणे आणि संमतीने झाल्या आहेत. भारतीय नोंदणी कायदा, 1908 नुसार, साक्षीदार प्रौढ, मानसिकदृष्ट्या सक्षम आणि व्यवहाराची माहिती असलेला असावा.
advertisement
कोण साक्षीदार होऊ शकत नाही?
14 वर्षांखालील व्यक्ती – अल्पवयीन व्यक्ती कायद्याने साक्षीदार होऊ शकत नाही.
विक्रेता किंवा खरेदीदार स्वतः – व्यवहारात सामील असलेली व्यक्ती साक्षीदार होऊ शकत नाही.
मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्ती – ज्याला परिस्थितीची समज नाही, अशा व्यक्तीला साक्षीदार करता येत नाही.
ज्यांना व्यवहाराची माहिती नाही – साक्षीदार म्हणून ती व्यक्ती असावी जी व्यवहार, त्याच्या अटी व किंमतीबाबत पूर्णपणे जागरूक आहे.
व्यवहार करताना काय लक्षात घ्याल?
नोंदणीसाठी ऑनलाइन वेळ ठरवून सब-रजिस्ट्रार कार्यालयात हजर व्हा. योग्य साक्षीदारांची निवड करा.सर्व कागदपत्रांची तपासणी आणि पडताळणी आधीच करा व्यवहार करताना मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क अचूक भरा.