TRENDING:

जंगली प्राण्यांनी पिकांचे नुकसान केलं तर मिळणार 50,000 रुपये, लाभ कसा मिळवायचा?

Last Updated:

Agriculture News : पावसानंतर शेतात जोमाने उगवलेल्या पिकांवर अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. हरणं, रानडुक्कर, माकडं, नीलगाय यांसारखे प्राणी मोठ्या कळपाने शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पावसानंतर शेतात जोमाने उगवलेल्या पिकांवर अलीकडच्या काळात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. हरणं, रानडुक्कर, माकडं, नीलगाय यांसारखे प्राणी मोठ्या कळपाने शेतात घुसून पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. एवढंच नाही तर काही ठिकाणी हे प्राणी थेट शेतकऱ्यांवर किंवा त्यांच्या पशुधनावर हल्ला करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मिळणारी नुकसानभरपाई योजना मोठा दिलासा देत आहे.
agriculture news
agriculture news
advertisement

वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान वाढले

शेतकऱ्यांच्या महिन्यांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या पिकांची काही क्षणांत हानी होते. काही गावांमध्ये तर सततच्या हल्ल्यामुळे शेतकरी शेतात काम करण्यासही घाबरत आहेत. अनेक वेळा या हल्ल्यांत गायी- म्हशीसारख्या पशुधनाचाही मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढतो. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारकडून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेद्वारे मदत दिली जाते.

advertisement

पिकांच्या नुकसानीसाठी किती मदत?

वन्यप्राण्यांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी शासनाने ठरावीक आर्थिक मदत निश्चित केली आहे.

कोरडवाहू पिके : प्रतिहेक्टरी 18,000 रुपये

बागायती पिके : प्रतिहेक्टरी 25,000 रुपये

फळबागा : प्रतिहेक्टरी 50,000 रुपये

ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत दिली जाते. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तरी मदतीची एक मर्यादा निश्चित आहे.

advertisement

नुकसानाची दाद कशी मागायची?

पिकांचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा.त्यानंतर

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताची पाहणी करतात.शेतकरी, वनकर्मचारी आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पंचनामा केला जातो. पंचनाम्यानंतर शेतकऱ्याचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेत नोंदवला जातो.सर्व तपासणीनंतर शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट नुकसानभरपाई जमा केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया सोपी व पारदर्शक करण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे.

advertisement

प्राणघातक हल्ल्यांसाठी विशेष मदत

शेतकऱ्यांचा किंवा गावकऱ्यांचा मृत्यू जर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाला, तर सरकारकडून त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत दिली जाते. एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास 5 लाख रुपये, तर किरकोळ जखमी झाल्यास 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते. ही मदत तातडीने पोहोचवण्यासाठी यंत्रणा सतत प्रयत्नशील असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
जंगली प्राण्यांनी पिकांचे नुकसान केलं तर मिळणार 50,000 रुपये, लाभ कसा मिळवायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल