संडास टाकीसाठी महत्त्वाचे वास्तुशास्त्र नियम:
संडास टाकीची योग्य दिशा - वास्तुशास्त्रानुसार, सेप्टिक टँक ठेवण्यासाठी वायव्य दिशा सर्वात उत्तम मानली जाते. ही दिशा नकारात्मक घटकांच्या व्यवस्थापनासाठी योग्य आहे. वायव्य दिशेव्यतिरिक्त पश्चिम दिशा देखील सेप्टिक टँकसाठी चांगली मानली जाते. काही वास्तु तज्ञ दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) आणि दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशांना सेप्टिक टँक ठेवण्यास योग्य मानत नाहीत. विशेषतः ईशान्य (उत्तर-पूर्व) आणि ब्रह्मस्थान (घराचा मध्यभाग) येथे सेप्टिक टँक कधीही बांधू नये. या दिशांमध्ये सेप्टिक टँक असल्यास गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.
advertisement
स्थान आणि अंतर - सेप्टिक टँक घराच्या मुख्य भिंतीपासून किमान थोडा तरी दूर किंवा पायापासून कमीत कमी 2 ते 3 फूट दूर असावा. थोडक्यात तो थेट घराच्या संरचनेला लागून नसावा. यामुळे संरचनेचे नुकसान टाळता येते आणि दुरुस्तीसाठीही सोपे जाते. वास्तुशास्त्रानुसार, सेप्टिक टँक थेट बेडरूम, पूजाघर किंवा किचनच्या खाली नसावा. सेप्टिक टँक घराच्या मुख्य दरवाजासमोर नसावा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते.
बेस्ट पार्टनर..! दोघांच छान जमेल; 4,13, 22, 31 जन्मतारखा असणाऱ्यांचे लकी मूलांक
सेप्टिक टँकची रचना - टाकीची लांबी पूर्व-पश्चिम दिशेने असावी आणि रुंदी उत्तर-दक्षिण दिशेने असावी. टाकी नेहमी आयताकृती असावी. गोल किंवा अनियमित आकाराची टाकी टाळावी. ड्रेनेज पाइप्सचा आउटलेट (निर्गमन) नेहमी उत्तर, पूर्व किंवा वायव्य दिशेला असावा. दक्षिण दिशेकडून पाण्याचा निचरा टाळावा, कारण यामुळे कुटुंबात मानसिक आणि कायदेशीर समस्या येऊ शकतात. आउटलेट दक्षिण दिशेला असेल, तर तो उत्तर, पूर्व किंवा वायव्य दिशेला वळवावा. सेप्टिक टँक कधीही जमिनीच्या प्लिंथ पातळीच्या वर नसावा. तो जमिनीच्या आतच असावा.
इतर महत्त्वाच्या गोष्टी - सेप्टिक टँकच्या वरती तुळशीचे रोप लावल्यास नकारात्मक ऊर्जा कमी होते, असे मानले जाते. सेप्टिक टँक नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे, कारण अस्वच्छता नकारात्मकता वाढवते, असे मानले जाते.
तुमच्या मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक आहे? मुली-महिलांचे येतात जास्त कॉल्स
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)