त्यामुळे अनेकदा चंद्र इतर ग्रहांशी युती करतो, ज्यामुळे काही राशींना शुभ तर काहींना अशुभ परिणाम जाणवतात. पंचांगानुसार, १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. या बदलामुळे काही राशींसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे.
advertisement
वृषभ - चंद्राचा आपल्या राशीत प्रवेश हा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत शुभ काळ ठरेल. मनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या फायदेशीर गुंतवणूक होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश लाभेल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. नोकरीत सकारात्मक बदल दिसून येतील, वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. एकूणच, हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आणि आनंददायी ठरेल.
तूळ - राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचा हा गोचर विशेष लाभदायक ठरेल. आर्थिक अडचणी दूर होतील आणि अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील. आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता प्रबळ आहे. नवीन व्यवसाय किंवा नोकरीच्या संधी मिळतील. प्रवासाचे योग असून, घरात शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. या काळात मिळालेल्या संधींचा योग्य फायदा घ्या.
कुंभ - कुंभ राशीसाठी चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश अत्यंत लाभदायक मानला जातो. आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. समाजात सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य सुधारेल आणि मानसिक तणाव कमी होईल. परदेश प्रवासाचे किंवा परदेशातील नवी संधी मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य आणि प्रेम वृद्धिंगत होईल.