संकष्टी चतुर्थी ही प्रथम पूजनीय श्री गणेशाच्या पूजेला समर्पित आहे. या दिवशी बाप्पाचे भक्त गोडधोड प्रसाद अर्पण करतात. उपवास आणि धार्मिक विधी देखील करतात. यावर प्रसन्न होऊन बाप्पा त्यांच्या जीवनातील संकटे दूर करतो.
अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योगात चतुर्थी : वैदिक दिनदर्शिकेनुसार संकष्टी चतुर्थीला अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. रात्री ८:५० ते ११:०९ या वेळेत मैत्रेय योग देखील तयार होत आहे. यासोबतच दुपारी १:१६ पासून शिववास योग देखील तयार होत आहे. असे शुभ योग अनेक वर्षांनी संकष्टी चतुर्थीला तयार होत आहेत. या शुभप्रसंगी आपण काही वास्तू उपाय करू शकतो.
advertisement
संकष्टीचे वास्तु उपाय : तुमचे घर दक्षिणेकडे तोंड करून असेल तर १६ एप्रिल रोजी दुपारी १:१६ नंतर शिववासात दरवाजाच्या मध्यभागी गणपतीचा फोटो लावा.
खराब वेळ आयुष्यात परत येणार नाही; मूलांकानुसार हातात असं शुभ घड्याळ घालावं
व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात आर्थिक नुकसान होत असेल. कोणी छुपे शत्रू तुम्हाला त्रास देत असतील, तर तुमच्या दुकानाच्या, ऑफिसच्या किंवा कोणत्याही कामाच्या ठिकाणी पश्चिम किंवा ईशान्य कोपऱ्यात डाव्या सोंडेच्या गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवा.
तुमच्या वाहनाचा वारंवार अपघात होत असेल किंवा वाहनात काही समस्या येत असेल तर मैत्रेय योगाच्या वेळी रात्री ८:५० ते ११:०९ या वेळेत गणेशाची मूर्ती किंवा समोरच्या आरशावर किंवा बोनेटवर गणपतीचे स्टिकर लावा आणि त्यावर एक छोटे स्वस्तिकही काढा. मैत्रेय योगात घरात गणेशाची मोठ्या पोटाची मूर्ती ठेवल्यास घरातील कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, असे मानले जाते.
गजलक्ष्मी राजयोग या राशींच्या नशिबात; लवकरच कायापालट करणाऱ्या वार्ता कानी पडणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)