Watch Numerology: खराब वेळ आयुष्यात परत येणार नाही; मूलांकानुसार हातात असं शुभ घड्याळ घालावं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Wrist Watch According To Numerology: प्रत्येकाला आयुष्यात चांगले-वाईट दिवस पाहावे लागतात. आपल्यावर आलेल्या खराब वेळे पाठीमागे घड्याळाचाही संबंध असू शकतो. आपण चुकीचं घड्याळ घातलं तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मुंबई : घड्याळाकडे न पाहता कोणाचाही दिवस जाणं शक्य नाही. कोणतंही कसलंही काम आपण घड्याळ लावून केलं नाही तर ते बेशिस्त ठरतं, त्याचा नकारात्मक परिणाम त्या व्यक्तीला सोसावा लागतो. प्रत्येकाला आयुष्यात चांगले-वाईट दिवस पाहावे लागतात. आपल्यावर आलेल्या खराब वेळे पाठीमागे घड्याळाचाही संबंध असू शकतो. आपण चुकीचं घड्याळ घातलं तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मनगटावर घड्याळ घालणं चांगल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. मूलांकानुसार कोणतं घड्याळ योग्य ठरेल पाहुया.
तुमच्या मूलांकानुसार कोणते घड्याळ घालावे?
मूलांक १ : मूलांक १ असलेल्या लोकांनी सोनेरी रंगाचे धातूची साखळी असलेले घड्याळ घालावे. हे घड्याळ तुमच्यासाठी प्रगती करणारे असेल. तुम्ही हे घड्याळ रविवारपासून घालावे.
मूलांक २ असलेल्या लोकांनी धातूची साखळी असलेले चांदीचे किंवा पांढऱ्या रंगाचे घड्याळ घालावे. सोमवारपासून हे घड्याळ घालावे.
मूलांक 3 असलेल्या लोकांनी देखील सोनेरी रंगाचे मनगटी घड्याळ घालावे. तुम्ही गुरुवारपासून हे घड्याळ घालावे.
advertisement
मूलांक ४ असलेल्या लोकांसाठी धातूचे राखाडी रंगाचे घड्याळ घालणे चांगले राहील. हे घड्याळ शनिवारपासून घालता येते.
मूलांक 5 असलेल्या लोकांनी चांदी आणि सोनेरी रंगाच्या मिश्रणाचे घड्याळ घालावे. बुधवारपासून ते परिधान करणे शुभ राहील.
advertisement
मूलांक ६ असलेल्या लोकांसाठी घड्याळ: मूलांक ६ असलेल्या लोकांनी शुक्रवारपासून सोनेरी रंगाचे घड्याळ घालावे. ते तुमच्यासाठी शुभ राहील.
भाग्यांक 7 असलेल्या लोकांनी देखील सोनेरी रंगाचे घड्याळ घालावे. शनिवारपासून हे घड्याळ घालण्यास सुरुवात करावी.
भाग्यांक 8 - मूलांक ८ असलेल्या लोकांनी मनगटावर काळ्या रंगाचे घड्याळ घालावे. हे घड्याळ फक्त शनिवारपासून घाला.
advertisement
मूलांक 9 च्या लोकांसाठी सोनेरी किंवा तांब्याचे रंगाचे घड्याळ घालणे शुभ ठरते. हे घड्याळ मंगळवारी परिधान करावे.
घड्याळ घालताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी -
घड्याळ घातल्यानंतर घड्याळाची वेळ योग्य असायला हवी. तुमच्या घड्याळातील वेळ पुढे किंवा मागे नसावी. तुम्ही तुमच्या जन्मक्रमांकानुसार योग्य घड्याळ घालाल तेव्हा तुमचे सर्व काम वेळेवर होईल. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतील. तुमचा वाईट काळही चांगला होईल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2025 12:24 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Watch Numerology: खराब वेळ आयुष्यात परत येणार नाही; मूलांकानुसार हातात असं शुभ घड्याळ घालावं