पितृदोष म्हणजे काय?
पूर्वज अतृप्त असल्यानं पितृदोष मागे लागतो. पूर्वजांचे निधन झाल्यावर त्यांचे विधीवत श्राद्ध किंवा तर्पण न झाल्यास पितृदोष त्रास देतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास आणि त्यांना मोक्ष न मिळाल्यास. पूर्वज दुःखी असतील, त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील किंवा त्यांनी त्यांच्या आयुष्यात काही मोठे पाप केले असेल, तर त्याचा परिणाम त्यांच्या पुढील पिढीवर होऊ शकतो.
advertisement
पूर्वजांचा अनादर: पूर्वजांचा अपमान करणे किंवा त्यांची अवहेलना करणे. कुटुंबाच्या कुलपरंपरा आणि धार्मिक विधींचे पालन न केल्यास. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ आणि शनि यांसारख्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा राहू-केतूच्या प्रभावामुळे पितृदोष निर्माण होतो असे मानले जाते.
पितृदोषाचे संकेत (लक्षणे) -
पितृदोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी आणि समस्या निर्माण होतात. विवाह जुळण्यास सतत अडचणी येणे किंवा विवाहानंतर वैवाहिक जीवनात कलह आणि तणाव असणे. काहीवेळा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचणे. संतती न होणे, संतती झाली तरी ती दीर्घकाळ न जगणे, मुले मंदबुद्धीची किंवा अपंग असणे. कुटुंबातील एखादा सदस्य सतत आजारी असणे किंवा दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असणे, उपचारांचा अपेक्षित परिणाम न दिसणं. व्यवसायात सतत तोटा होणे, नोकरीत अडचणी येणे, आर्थिक प्रगती खुंटणे, कर्ज वाढणे आणि पैशांची बचत न होणे. घरात नेहमी भांडणे, मतभेद आणि अशांतता असणे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सलोखा नसणे. घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा जाणवणे, भय वाटणे किंवा शांतता नसणे. नोकरीत स्थैर्य नसणे, वारंवार नोकरी बदलणे किंवा व्यवसायात वारंवार अपयश येणे. घरात कोणतीही शुभ कार्ये करताना सतत विघ्नं येणं.
श्रावण सोमवारी अशी करतात विधीपूर्वक पूजा; या मंत्रांचा अखंड करावा जप शुभफळ
पितृदोष निवारणाचे उपाय काय -
पितृदोषाचे निवारण करण्यासाठी अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहेत. हे उपाय श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने केल्यास पितृदोषाचा प्रभाव कमी होऊन जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. जुलै महिन्याची अमावस्या जवळ आली आहे. श्रावण लागण्याआधी एक दिवस अमावस्या आहे, या दिवशी पितरांना जल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे पितरांना शांती मिळते.
दुपारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावावा. रोज गायीला, कुत्र्याला कावळ्याला (जे पितरांचे प्रतीक मानले जातात) भोजन द्यावे. घरात दक्षिण दिशेला पितरांचा फोटो लावावा आणि त्यांना रोज हार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे.
मंत्र जप:
पितृ गायत्री मंत्र: "ॐ देवताभ्यः पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च । नमः स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः ।।" या मंत्राचा रोज एक माळ (१०८ वेळा) जप करावा. भगवान शंकराचा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानेही पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. शिवलिंगावर जल अर्पण करताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)