गृहप्रवेश करणे शुभ की अशुभ - वास्तुशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी गृहप्रवेश करणे अशुभ मानले जाते, कारण धनत्रयोदशीच्या काळात 'वास्तु' सुप्त अवस्थेत असतो. अशा परिस्थितीत घरात प्रवेश केल्याने वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, तसेच घरात नकारात्मक ऊर्जा, दुर्भाग्य आणि आर्थिक अडचणींचा प्रवेश होऊ शकतो. धनत्रयोदशी कार्तिक कृष्ण त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते आणि ही तिथी चातुर्मासांतर्गत येते, यामध्ये विवाह, साखरपुडा किंवा गृहप्रवेश यांसारखे कोणतेही मांगलिक कार्य केले जात नाही. चातुर्मासात विष्णू योग निद्रेत असतात, ज्यामुळे कोणतेही मांगलिक आणि शुभ कार्य केले जात नाहीत.
advertisement
धनत्रयोदशीला गृहप्रवेश का करू नये?
घराला वास्तुदोष लागू शकतो - वास्तुशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या निमित्ताने नवीन घरात प्रवेश करू नये, कारण या काळात वास्तुदेव सुप्त असतात, म्हणजेच वास्तु निष्क्रिय असतो. अशा अवस्थेत घरात प्रवेश केल्यास वास्तुदोष कायम राहू शकतो.
दिवाळीच्या आनंदात एक गोष्ट विसरू नका! नरक चतुर्दशीला यमतर्पण करण्याचं महत्त्व
घरावर संकट येण्याची शक्यता - धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या निमित्ताने गृहप्रवेश करणे कुटुंबातील लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या दिवशी कुटुंबातील लोकांसोबत नकारात्मक ऊर्जेचाही घरात प्रवेश होऊ शकतो.
घराला आर्थिक अडचणी - धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन घरात प्रवेश केला, तर घरातील प्रमुखाला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. संपूर्ण आयुष्यभर कोणती ना कोणती धन-संबंधी समस्या कायम राहू शकते.
धनत्रयोदशीला काय करणे शुभ -
तुम्ही धनत्रयोदशीवर नूतनीकरण (Renovate) केलेल्या घरात प्रवेश करू शकता.
धनत्रयोदशीला एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
धनत्रयोदशीला सोने-चांदीचे दागिने खरेदी करू शकता.
धनत्रयोदशीला वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)