शनिवार हा शनि ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शनि हा क्रूर ग्रह म्हणून ओळखला जातो. लोकांना शनिची भीती वाटते, परंतु अनेकांना माहीत नसेल शनी एखाद्यावर प्रसन्न होतो तेव्हा त्यांच्या आयुष्यातील सर्व संघर्ष संपतात आणि यशाचा मार्ग सुरू होतो. शनिवारशी संबंधित काही नावे पाहुया.
शनिवारी जन्मलेल्या बाळांसाठी नावे -
advertisement
सानवी - या नावाचा अर्थ देवी असा होतो.
शनाया - या नावाचा अर्थ विशेष असा आहे.
गदिन - जो गदा धारण करतो असा व्यक्ती.
शरण्य - आश्रय देणारा-देणारी असा अर्थ होतो.
वरेण्य - या नावाचा अर्थ उत्कृष्ट असा आहे.
शिवन्या - या नावाचा अर्थ शक्तीचा भाग असा आहे.
शितिका - या नावाचा अर्थ शीतलता.
शिविका - या नावाचा अर्थ पालखी आहे.
शुक्ति - शुक्ति नावाचा अर्थ कवच किंवा मोती असा आहे.
शास्था - या नावाचा अर्थ आकर्षक असा आहे.
भानु: या नावाचा अर्थ सूर्यदेव. शनिदेव सूर्यदेवाचे पुत्र आहेत.
डोक्याला नुसता ताप..! लागोपाठ शनी-बुध मार्गी झाल्यानंतर 4 राशींवर वाईट दिवस
ज्योतिषशास्त्रानुसार, नावाप्रमाणेच शनि हा शनिवारचा अधिपती आहे, तो न्याय आणि कर्माच्या फळांचा कारक आहे आणि शनिवारी जन्मलेल्या मुलावर शनिचा विशेष प्रभाव असतो. शनिवारी जन्मलेल्या लोकांमध्ये काही गोष्टी खास मानल्या जातात.
शनिवारी जन्मलेले लोक मेहनती असतात.
शनिवारी जन्मलेले लोक स्वभावाने काहीसे गंभीर वाटतात.
शनिवारी जन्मलेले लोक कामात शिस्तप्रिय असतात.
शनिवारी जन्मलेले लोक कामात आपले ध्येय ठरवून ते साध्य करतात.
शनिवारी जन्मलेले लोक कुठेही सहजा-सहजी हार मानत नाहीत.
शनिवारी जन्मलेले लोक आपल्या कौटुंबिक संबंधांना महत्त्व देणारे असतात. कोणत्याही परिस्थितीत कुटुंबासाठी सर्वकाही करण्यात पुढे असतात.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
