Shani Budh Margi 2025: डोक्याला नुसता ताप..! लागोपाठ शनी-बुध मार्गी झाल्यानंतर 4 राशींवर वाईट दिवस
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Budh Margi 2025: ज्योतिषशास्त्रात नोव्हेंबर महिना खास आहे. दिनांक 28 नोव्हेंबर रोजी न्यायदेवता शनी ग्रह सरळ मार्गी चाल करेल, तर 30 नोव्हेंबर रोजी ग्रहांचा राजकुमार बुधही सरळ मार्गी होईल. ग्रहांच्या या स्थितीचा राशीचक्रावर परिणाम पाहायला मिळेल.
advertisement
वृषभ - शनी आणि बुध सरळ मार्गी होताच, वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक आघाडीवर अडचणी येऊ शकतात. तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर परिणाम होऊ शकतो. पदोन्नती किंवा बढतीच्या मार्गात पुन्हा व्यत्यय येऊ शकतो. तुम्हाला कामावर आणि घरातही ताण येईल. 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. या दिवशी बुधाची वक्री गती सुरू झाल्यानं तुम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळेल. तोपर्यंत तुम्हाला अत्यंत सतर्क राहावे लागेल.
advertisement
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना देखील अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. लांबचा प्रवास धोकादायक ठरू शकतो. या काळात कोणतेही मोठ्या रिस्क पत्करणे टाळा. नोकरी आणि इतर संबंधित बाबींमध्ये अडचणी उद्भवू शकतात. व्यवसायातील नफा कमी झाल्याने चिंता निर्माण होईल. कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात कटुता येऊ शकते आणि प्रेमसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
advertisement
धनु - शनी आणि बुध यांची सरळ चाल धनु राशीच्या राशीच्या लोकांसाठी त्रासदायक असू शकते. वर्षाच्या शेवटी तुम्हाला हक्काचे पैसे कमविण्यातही अडचणी येतील. खर्च वाढतील आणि उत्पन्न कमी होऊ शकते. याचा अर्थ संपत्ती मिळवणं खूप कठीण होईल. यश मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध चांगले ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. इतरांशी वाद टाळा.
advertisement
मकर - आर्थिक परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला अचानक पैशाची अडचण जाणवेल. अडकलेले किंवा कर्ज घेतलेले पैसे परत मिळवणे कठीण होईल. बोलण्यात आणि वागण्यात होणारी चिडचिड तुमची प्रगती बिघडवू शकते. तुम्ही तुमचा प्रियजनांपासून मनाने दूर जाऊ शकता. शत्रू आणि कट रचणारे कारस्थान करू शकतात. तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतील. कुटुंबात त्रास आणि तणाव निर्माण होऊ शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


