पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा मानलं जातं. गुरुपुष्यामृत योगात केलेले कोणतेही कार्य अत्यंत शुभ, फलदायी आणि यशस्वी होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे आहे. गुरुपुष्यामृत योग कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन घर खरेदी करण्यासाठी, मालमत्ता किंवा वाहनांची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.
सोने-चांदीची खरेदी: या दिवशी सोने, चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे विशेषतः लाभदायक मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंची वृद्धी होते. त्या गोष्टी शाश्वतपणे आपल्यासोबत राहतात. तसंच हा योग मंत्र सिद्धी, साधना, धार्मिक विधी, पूजा आणि जप करण्यासाठी सर्वोत्तम असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास धन आणि समृद्धी प्राप्त होते.
advertisement
उरलेल्या वर्ष २०२५ मधील गुरुपुष्यामृत योग -
पहिला योग: गुरुवार, २४ जुलै, २०२५
वेळ: दुपारी ०४:४३ पासून २५ जुलै, शुक्रवार पहाटे ०५:३९ पर्यंत.
दुसरा योग: गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५
वेळ: सकाळी ०५:५३ पासून २२ ऑगस्ट, शुक्रवार मध्यरात्री १२:०८ पर्यंत.
तिसरा योग: गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५
वेळ: सकाळी ०६:०७ पासून ०६:३२ पर्यंत.
पण, यापैकी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील गुरुपुष्यामृत योग पूर्ण दिवस असल्याने ते विशेष फलदायी मानले जातात. गुरुपुष्यामृत योग मौल्यवान धातूंच्या खरेदीसाठी अत्यंत शुभ आहे. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी केल्यास घरात धन आणि समृद्धी वाढते, असे मानले जाते. नवीन नोकरी सुरू करणे, नवीन व्यवसाय किंवा एखादे महत्त्वाचे काम सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. गणपती, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा, श्रीसूक्त किंवा विष्णू सहस्रनामचे पठण करणे खूप लाभदायक ठरते.
गुरु आणि शनीची उपासना: पुष्य नक्षत्राचा स्वामी शनि आहे आणि गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्याने गुरु व शनीचा शुभ संयोग जुळून येतो. त्यामुळे या दिवशी दोन्ही ग्रहांची उपासना करणे शुभ फलदायी असते. गरजूंना दानधर्म केल्यास त्याचे शुभ फळ अनेक पटींनी वाढते. पण, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी विवाह विधी करणे टाळले जाते, कारण पुष्य नक्षत्र विवाहांसाठी वर्ज्य मानले जाते. मात्र, इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आहे.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)