माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा कशी मिळवावी - देवउठनी एकादशीला भगवान विष्णूचा आशीर्वाद तर घेतला जातोच, पण ही तिथी माता लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठीही विशेष आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधीनुसार पूजा केल्यानं जीवनातील सर्व दुःख आणि पापांचा नाश होतो.
advertisement
धनवर्षा करेल तुळस! घराची लक्ष्मी मानून नित्य या गोष्टी केल्यानं सुख-शांती-धनलाभ
तुम्हाला कार्तिकी एकादशीला माता लक्ष्मीची विशेष कृपा हवी असेल, तर या दिवशी तुळशीच्या ८ नावांचा जप आणि तुळशी मंत्राचा जप नक्की करावा. तुळशीच्या रोपात माता लक्ष्मीचा वास असतो, तुळशी देवी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. अशा प्रकारे, तुळशीला प्रसन्न करून लक्ष्मीला प्रसन्न करता येतं. घरी विराजमान असलेल्या माता तुळशीच्या ८ नावांच्या मंत्राचा जप केल्यास किंवा थेट ८ नावे घेतल्यास, तुम्ही माता तुळस, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना एकाच वेळी प्रसन्न करून दुःख आणि धनाशी संबंधित अडचणींवर मात करू शकता.
तुळशी मंत्राचा जप
वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी।
पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी।।
एतभामांष्टक चैव स्रोतं नामर्थं संयुक्तम।
य: पठेत तां च सम्पूज् सौऽश्रमेघ फललंमेता।।
तुळशीच्या आठ नावांचा करा जप
पुष्पसारा, नन्दिनी, वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, तुलसी आणि कृष्ण जीवनी।
तुळशीच्या पूजेत या सामग्रीचा करा वापर -
तुळशीच्या पूजेसाठी पूजा ताटात तुपाचा दिवा, धूप ठेवा. सिंदूर, चंदन, नैवेद्य ठेवा आणि अर्पण करण्यासाठी फुले वाहा. दररोज माता तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मकता टिकून राहते.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
