वृषभ - बुध तुमच्या राशीपासून तिसऱ्या घरात वक्री होईल. हे घर संवाद आणि संयमाचे कारक देखील मानले जाते. बुध वक्री असल्याने तुमच्या संवाद क्षमतेवर परिणाम होईल. तुम्ही तुमचे शब्द लोकांवर लादण्याचा प्रयत्न करू शकता आणि तुमच्या शब्दांनी सहकारी आणि कुटुंबातील कोणाला दुखवू शकता. या राशीचे लोक अनावश्यक वादात पडून त्यांचा वेळ वाया घालवतील. अहंकाराचा अतिरेक तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर नेईल. या काळात तुम्ही जितके कमी बोलाल तितके तुमच्यासाठी चांगले होईल.
advertisement
मिथुन - बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि तुमच्या दुसऱ्या भावात वक्री असेल. दुसऱ्या भावाला वाणीचा कारक मानले जाते. म्हणून, बुध वक्री असल्याने तुमच्या बोलण्यात कटुता येऊ शकते. या काळात तुम्ही तुमचे काम पूर्ण करण्यासाठी खोटे बोलू शकता. कौटुंबिक जीवनात, तुम्ही वाद घालू शकता आणि तुमच्या कुटुंबातील कोणाला दुखवू शकता. या काळात, स्वतःला सर्वोत्तम दाखवण्याच्या हट्टीपणाचा तुमच्या प्रेम आणि वैवाहिक संबंधांवरही परिणाम होईल. तथापि, पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
मकर - बुध तुमच्या सातव्या भावात भ्रमण करेल, तो भागीदारी आणि सामाजिक संबंधांचा कारक मानला जातो. या भावात बुध वक्री असल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात प्रतिकूल परिणाम मिळू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात, तुमचे बोलणे तुमच्या भागीदारांना दुखवू शकते. सहकाऱ्यांशी बोलताना तुम्ही संयम गमावू शकता, याचा तुमच्या प्रतिमेवर वाईट परिणाम होईल. विवाहित जीवनात बोलतानाही सावधगिरी बाळगली पाहिजे. कमी बोलून आणि एकांतात वेळ घालवून तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवू शकता.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)