शूल योग म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रात शूल योग हा अशुभ योग मानला जातो, ज्यामध्ये सातही ग्रह तीन राशींमध्ये आलेले असतात. या योगात कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते, त्यामुळे व्यक्तीला त्रास होतो.
त्रास बराच काळ होतो - शूल म्हणजे 'छेदन शस्त्र'. या योगात केलेले कोणतेही काम, जरी यशस्वी झाले तरी व्यक्तीच्या जीवनात दीर्घकालीन दुःख निर्माण करू शकते.
advertisement
शूल योगाचे दुष्परिणाम महादेवाच्या कृपेनं दूर होतील -
राहु हा शूल योगाचा स्वामी आहे आणि भगवान शिव राहूचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. महादेवाची नियमित पूजा केल्यानं शूल योगाचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. हा परिणाम कमी करण्यासाठी दररोज शंकरा जल अर्पण करा आणि महामृत्युंजयाचा जप करा. यासोबतच बेलपत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. एखाद्या व्यक्तीचा जन्म शूल योगात झाला असेल तर शूल योग शांती पूजा करणे धार्मिकदृष्ट्या आवश्यक आहे.
७ शनिवार व्रत केल्याने शनीच्या त्रासातून सुटका -
अग्नि पुराणानुसार, शनिवारचे व्रत शनीच्या साडेसाती आणि अडीचकीपासून सुटका मिळवण्यासाठी केले जाते. श्रावण महिन्यात येणाऱ्या शनिवारी हे व्रत सुरू करण्याचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय, शुक्ल पक्षातील कोणत्याही शनिवारपासून हे व्रत सुरू करता येते. मान्यतेनुसार, ७ शनिवारी उपवास केल्याने शनीच्या कोपापासून मुक्ती मिळते आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. यासोबतच शनिदेवाचे विशेष आशीर्वाद देखील मिळतात.
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
शनिची पूजा -
शनिवारी शनिदेवाची पूजा सुरू करण्यापूर्वी, 'आज मी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करत आहे' असा संकल्प मनात करा. शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या डोळ्यात थेट पाहू नये. तुमची नजर खाली किंवा त्यांच्या पायांवर ठेवा. जर घरी पूजा करत असाल, तर एका लाकडी पाटावर काळे वस्त्र अंथरून त्यावर शनिदेवाचा फोटो किंवा प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करा.
दीप प्रज्वलन: मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा दिवा शनिदेवासमोर किंवा पिंपळाच्या झाडाखाली लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तेल इकडे-तिकडे सांडणार नाही याची काळजी घ्या. तयार केलेला नैवेद्य (उदा. तिळगूळ लाडू, खिचडी) अर्पण करा. कोणत्याही शनि मंत्राचा किमान १०८ वेळा जप करा. यासाठी रुद्राक्षाची माळ वापरणे शुभ मानले जाते.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)