वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही व्यावसायिक जागेचं यश त्या जागेच्या ऊर्जेवर अवलंबून असतं. ही ऊर्जा चार दिशांमधून येते - उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. यापैकी, दक्षिण-पश्चिम (South-West) नैऋत्य दिशा खूप खास मानली जाते. ही जागा स्थिरता, नियंत्रण आणि मालकाच्या शक्ती याचं प्रतीक असते.
या दिशेला दुकानाचे मुख्य प्रवेशद्वार (एंट्री) असेल, तर वास्तुशास्त्रानुसार ते चांगलं मानलं जात नाही. अशी एंट्री दुकानातील सकारात्मक ऊर्जा बिघडवते. ज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ आणि न्यूमेरोलॉजिस्ट हिमाचल सिंह यांच्याकडून याविषयी जाणून घेऊया, दक्षिण-पश्चिम दिशेला एंट्री असल्यास दुकानात काय परिणाम होतात आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतात.
advertisement
दक्षिण-पश्चिम एंट्री असलेलं दुकान:
दक्षिण-पश्चिम एंट्री असलेल्या दुकानात ग्राहकांची कमी राहते. या दिशेला दुकानाचे तोंड असल्यानं ऊर्जेचा प्रवाह चांगला राहत नाही, ज्यामुळे ग्राहक कमी येऊ लागतात. अनेकदा दुकान चांगल्या ठिकाणी असूनही गर्दी होत नाही. कधी-कधी पैशांची कमाई होते, पण बचत होत नाही आणि पैसा टिकत नाही. जितके कमावले तितकेच खर्च झाले, असे वाटत राहते. दक्षिण-पश्चिम एंट्रीमुळे दुकानात अस्थिरता येते, ज्यामुळे मालकाचे मन कामात लागत नाही. मालकाला अस्वस्थता, चिंता आणि मानसिक थकवा जाणवतो. बिजनेसमध्ये लक्ष केंद्रित होत नाही. अचानक दुरुस्ती, नुकसान किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित समस्या वाढतात. ही दिशा आर्थिक स्थिरतेवर परिणाम करते. अशा ठिकाणी कर्मचारी टिकत नाहीत. ते वारंवार नोकरी सोडतात किंवा पूर्ण मनाने काम करत नाहीत.
घरात वारंवार अशा गोष्टी होणं म्हणजे पितृदोष; भाग्याची साथ मिळण्यासाठी उपाय
जर दुकान खूप लहान असेल (100 ते 200 चौरस फुटांच्या दरम्यान), दुकान भाड्याने घेतले असेल, कॅश काउंटर चुकीच्या म्हणजे नैऋत्य असेल, किंवा दुकानाच्या मागील बाजूची भिंत तुटलेली असेल. तर या दिशेचा नकारात्मक परिणाम अजून वाढतो.
हा दोष कमी करण्यासाठी प्रवेशद्वारावर जाड सतरंजी किंवा चटई ठेवावी. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि दुकानाच्या आत संतुलन राखले जाते. दरवाजाच्या उजव्या बाजूला तांब्याची पट्टी लावावी. हा उपाय वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा प्रवाह योग्य दिशेने आणण्यास मदत करतो. कॅश काउंटर उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवावा. ही दिशा सर्वात शुभ मानली जाते. यामुळे पैसा स्थिर राहतो आणि कमाई वाढते. नैऋत्य दिशेची भिंत भक्कम करावी. या ठिकाणी गडद रंग लावावा, देवाचे फोटो किंवा तिजोरी ठेवावी. यामुळे व्यवसायात स्थिरता येते. एंट्रीच्या वर "ॐ नमः शिवाय" किंवा हनुमान चालीसेचा काही भाग लिहावा. यामुळे मानसिक शांती आणि सुरक्षा मिळते. शक्यतो काचेचा दरवाजा नसावा, कारण काचेमुळे ऊर्जा वारंवार बाहेर पडते. लाकडी मजबूत दरवाजा ठेवणे चांगले राहील.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
