PitruDosh: घरात वारंवार अशा गोष्टी होणं म्हणजे पितृदोष; भाग्याची साथ मिळण्यासाठी नियमित काय कराल

Last Updated:

PitruDosh Tips: घरात पितृदोष असेल तर लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे आर्थिक संकटेही वाढतात. पूर्वजांना हिंदू धर्मात महत्त्वाचं मानलं आहे, त्यांची कृपा कुटुंबावर राहिल्यास सर्वांना सुख-शांती लाभते.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात काही दोषांना अतिशय त्रासदायक मानलं जातं. यामध्ये पितृदोषाचा समावेश होतोय. घरात पितृदोष असेल तर लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे आर्थिक संकटेही वाढतात. पूर्वजांना हिंदू धर्मात महत्त्वाचं मानलं आहे, त्यांची कृपा कुटुंबावर राहिल्यास सर्वांना सुख-शांती लाभते. आज आपण पितृदोषाचे संकेत आणि उपाय याविषयी जाणून घेणार आहोत.
पूर्वज अतृप्त असल्यानं पितृदोष मागे राहतो. पूर्वजांचे निधन झाल्यावर त्यांचे विधीवत श्राद्ध किंवा तर्पण न झाल्यास पितृदोष त्रास देतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास आणि त्यांना मोक्ष न मिळाल्यास अडचणी वाढतात. पूर्वज दुःखी असतील, त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या असतील तर त्याचा परिणाम त्यांच्या पुढील पिढीवर होऊ शकतो.
पूर्वजांचा अनादर - पूर्वजांचा अपमान करणे किंवा त्यांची अवहेलना करणे. कुटुंबाच्या परंपरा आणि धार्मिक विधींचे पालन न केल्यास. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत सूर्य, चंद्र, गुरु, मंगळ आणि शनि यांसारख्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा राहू-केतूच्या प्रभावामुळे पितृदोष निर्माण होतो, असे मानले जाते.
advertisement
पितृदोषाचे संकेत -
पितृदोषामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. विवाह जुळण्यास सतत अडचणी येणे किंवा विवाहानंतर वैवाहिक जीवनात कलह आणि तणाव असणे. काहीवेळा प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचणे. संतती न होणे, संतती झाली तरी ती दीर्घकाळ न जगणे, मुले मंदबुद्धीची किंवा अपंग असणे. कुटुंबातील कोणी सतत आजारी असणे किंवा दीर्घकाळापासून गंभीर आजाराने त्रस्त असणे, उपचारांचा अपेक्षित परिणाम न दिसणं. व्यवसायात सतत तोटा होणे, नोकरीत अडचणी येणे, आर्थिक प्रगती खुंटणे, कर्ज वाढणे आणि पैशांची बचत न होणे. घरात नेहमी भांडणे, मतभेद आणि अशांतता असणे. कुटुंबात सलोखा नसणे. घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा जाणवणे, भय वाटणे किंवा शांतता नसणे. नोकरीत स्थैर्य नसणे. घरात कोणतीही शुभ कार्ये करताना सतत विघ्नं येणं.
advertisement
पितृदोष निवारणाचे उपाय काय -
पितृदोषाचे निवारण करण्यासाठी अनेक उपाय ज्योतिषशास्त्रात आणि धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहेत. कार्तिक अमावस्या जवळ आली आहे. या दिवशी पितरांना जल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे पितरांना शांती मिळते. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. फुले, अक्षत, दूध, गंगाजल आणि काळे तीळ अर्पण करून पितरांचे स्मरण करावे. पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावावा. गायीला, कुत्र्याला कावळ्याला (जे पितरांचे प्रतीक मानले जातात) भोजन द्यावे. घरात दक्षिण दिशेला पूर्वजांचा फोटो लावावा, त्यांना हार अर्पण करून त्यांचे स्मरण करावे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
PitruDosh: घरात वारंवार अशा गोष्टी होणं म्हणजे पितृदोष; भाग्याची साथ मिळण्यासाठी नियमित काय कराल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement