Viral Video: तोड नाही भावाच्या आवाजाला! बॉर्डर पिक्चरमधलं गाणं गाणाऱ्या ‘पाइप सिंगर’ची कला पाहिलीय का?
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Viral Video Marathi: लोखंडी पाईपच्या आधारावर एका तरुणाने ‘बॉर्डर’ चित्रपटातील गाजलेलं गाणं ‘संदेशे आते है…’ इतक्या सुरेख पद्धतीनं गायलं की त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचं गाणं ऐकून कोणीही वाह-वाह केल्याशिवाय राहणार नाही.
नवी दिल्ली : भारतात कलाकारांची कमी नाही, आपल्या खेडो-पाड्यातही किती भन्नाट टॅलेंट दडलेलं आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. साधनांची कमतरता असली तरी कला आणि भावना मनात असली की ती कुठल्याही मार्गाने बाहेर येते, हेच एका तरुणाने दाखवून दिलंय. लोखंडी पाईपच्या आधारावर एका तरुणाने ‘बॉर्डर’ चित्रपटातील गाजलेलं गाणं ‘संदेशे आते है…’ इतक्या सुरेख पद्धतीनं गायलं की त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये हा तरुण अगदी मोकळ्या साध्या ठिकाणी उभा राहून गाताना दिसतो. कोणतंही वाद्य नाही, स्टुडिओ नाही, माइक नाही, फक्त एक लोखंडी पाईप आणि त्यावर दिलेला हलका ठेका. तरीही त्याच्या आवाजातली भावना थेट मनाला भिडते. ‘संदेशे आते है…’ या गाण्यातील शब्द तो इतक्या जिव्हाळ्याने गातो की क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. सैनिकांची घराची ओढ, आई-वडिलांची आठवण आणि देशासाठी केलेलं बलिदान या सगळ्या भावना त्याच्या आवाजातून जाणवतात. गाणं गाताना त्यानं पूर्ण एकाग्र होऊन गायल्याचं दिसत आहे आणि त्याचं गायनावर असलेलं प्रेमही दिसून येतंय.
advertisement
हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे. काही तासांतच हजारो व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी व्हिडिओ शेअर करत या तरुणाचं कौतुक केलं आहे. “खरं टॅलेंट गावातच असतं”, “अवाजात प्रचंड भावना आहे”, “डोळे पाणावले” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काहींनी तर या तरुणाला मोठ्या व्यासपीठावर संधी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
advertisement
advertisement
आजच्या डिजिटल युगात अशा व्हिडिओंमुळे गावाकडचं टॅलेंट थेट लोकांसमोर येत आहे. साधेपणा, मेहनत आणि मनापासून गायलेलं गाणं लोकांना किती भावू शकतं, हे या व्हिडिओने दाखवून दिलं आहे. हा भावूक आणि देशभक्तीने भरलेला व्हिडिओ खाली आपण ऐकू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:34 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Viral Video: तोड नाही भावाच्या आवाजाला! बॉर्डर पिक्चरमधलं गाणं गाणाऱ्या ‘पाइप सिंगर’ची कला पाहिलीय का?











