समोर दिसेल त्याला फाडून काढलं! चाकणनंतर दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एकाच दिवशी २० जणांवर हल्ला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
दापोलीतील कोळथरे पंचनदी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने १५ ते २० नागरिकांना चावा घेतला, अनेक जखमी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण.
शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली: रत्नागिरीच्या दापोलीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे आणि पंचनदी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. समोर येईल त्या व्यक्तीवर हे कुत्रं हल्ला करत असून, आतापर्यंत १५ ते २० नागरिकांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. चाकण पाठोपाठ आता दापोलीत कुत्र्यानं हैदोस घालायला सुरुवात केली आहे.
आधी बदलापूर अंबरनाथ, त्यानंतर पुणे आणि आता दापोलीत पिसळलेल्या कुत्र्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून या पिसाळलेल्या कुत्र्याने कोळथरे पंचनदी परिसरात दहशत निर्माण केली आहे. या हल्ल्यातून लहान मुले, महिला आणि वयोवृद्धही सुटलेले नाहीत. कुत्र्याने अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली.

advertisement
या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकाच वेळी अनेक जण जखमी झाल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 1:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
समोर दिसेल त्याला फाडून काढलं! चाकणनंतर दापोलीत पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एकाच दिवशी २० जणांवर हल्ला







