सिंह - सूर्याचे संक्रमण तुमच्या राशीपासून १२ व्या घरात असेल. ज्योतिषशास्त्रात हे घर नुकसान, डोळे आणि मृत्युचे मानले जाते. या घरात सूर्य येत असल्यानं तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे देखील आरोग्य बिघडू शकते. सिंह राशीच्या लोकांना काही गंभीर आजार असल्यास, कर्क राशीतील सूर्याच्या संक्रमणादरम्यान ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी निश्चितच त्यांची आरोग्य तपासणी करावी. काही लोकांना अपचन आणि पोटदुखीची समस्या देखील बळावू शकते. उपाय म्हणून सूर्य मंत्रांचा जप करा.
advertisement
धनु - सूर्य धनु राशीच्या आठव्या घरात भ्रमण करेल. या संक्रमणाच्या प्रभावामुळे तुम्हाला खालच्या ओटीपोटात वेदना होण्याची समस्या उद्भवू शकते. यासोबतच करिअर आणि कौटुंबिक जीवनात काही बदल देखील तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात. या राशीच्या लोकांनी गाडी चालवताना काळजी घ्यावी. दैनंदिन दिनचर्या सुधारून तुम्हाला आरोग्य लाभ मिळू शकतात. यासोबतच, उपाय म्हणून तुम्ही सूर्य देवाला जल अर्पण करावे.
कुंभ - तुमच्या राशीच्या सहाव्या घरात होणारे सूर्याचे भ्रमण हृदयाशी संबंधित आरोग्य समस्या निर्माण करण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुमचे विरोधक तुमच्या कामात अडचणी आणू शकतात, तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. या काळात चुकीच्या लोकांचा सहवास टाळा, अन्यथा तुमच्या आरोग्यावर आणि आर्थिक बाजूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. उपाय म्हणून, तुम्ही गूळ आणि गहू दान करावे आणि योग-ध्यान करून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करावा.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)