वर्षातील दुसरे सूर्यग्रहण कधी होईल -
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला होणार आहे. म्हणजेच त्यादिवशी सर्वपित्री दर्श अमावस्या असेल. सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी होईल. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून २२ सप्टेंबर रोजी पहाटे ३:२४ वाजेपर्यंत असेल. त्याचा एकूण कालावधी ४ तास २४ मिनिटे असेल. दुसऱ्याच दिवशी म्हणजे अश्विनी मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सुरू होईल. ज्याने शारदीय नवरात्रीची सुरुवात होईल.
advertisement
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसेल की नाही?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, अर्थातच ते रात्री होत आहे. हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराच्या काही भागातून पाहता येईल.
30 वर्षांनी शनिची गुरुच्या राशीत सरळ चाल! या राशींचे अचानक दिवस पालटणार
वर्षातील दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी-
शास्त्रांनुसार, सूर्यग्रहण सुरू होण्याच्या सुमारे १२ तास आधी सुतक काळ सुरू होतोय. पण वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही.
सरप्राईज! बुधाची बुधवारी डबल चाल; या 5 राशींच्याकडे येणार पैसा, अनपेक्षित लाभ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)