वास्तूत झाडूचे महत्त्व - वास्तुशास्त्रानुसार योग्यरीत्या वापरलेला झाडू घरात शांती, संपत्ती आणि आर्थिक स्थिरता वाढवतो. मात्र, झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवला असेल किंवा त्याचा गैरवापर होत असेल, तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. उदाहरणार्थ, झाडू उलटा ठेवणे, घराच्या मध्यभागी ठेवणे किंवा प्रत्येकाच्या समोर येईल असा ठेवणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने देवी लक्ष्मीची अवकृपा होते, अनावश्यक खर्च तसेच आर्थिक अडचणी निर्माण होतात असे मानले जाते.
advertisement
झाडू खरेदी करण्यासाठी शुभ दिवस - वास्तुशास्त्रानुसार नवीन झाडू खरेदी करण्यासाठी काही शुभ दिवस आहेत. मंगळवार आणि शनिवार हे दिवस झाडू खरेदीसाठी उत्तम मानले जातात. दिवाळी आणि धनत्रयोदशीसारख्या सणांना नवीन झाडू खरेदी करणे विशेषतः शुभ असते. शुभ दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाचा ओघ सुधारतो. वास्तुशास्त्रानुसार कृष्ण पक्षाच्या अमावस्येला झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. याउलट, शुक्ल पक्षात झाडू खरेदी केल्याने घरात दुर्दैव येते, असे मानले जाते. कृष्ण पक्षातील शनिवारी खरेदी केलेल्या झाडूची ऊर्जा विशेष प्रभावशाली असते असे म्हणतात.
नक्कीच शुभ संकेत समजावेत! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात
झाडू ठेवण्याची योग्य दिशा - अनेक लोकांना अमावस्येला झाडू खरेदी करावा की नाही याबद्दल शंका असते. काही वास्तु तज्ज्ञांच्या मते अमावस्येला झाडू खरेदी केल्याने आर्थिक नुकसान होऊ शकते आणि पितरही नाराज होऊ शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगावी. घरात झाडू ठेवण्याची जागासुद्धा खूप महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रानुसार झाडू दक्षिण, दक्षिण-पश्चिम, पश्चिम किंवा उत्तर-पश्चिम दिशेला जमिनीवर आडवा करून ठेवावा. झाडू कधीही उभा करून ठेवू नये, तो नेहमी जमिनीवर आडवाच ठेवावा.
झाडू आणि घराची ऊर्जा - घरात झाडू ठेवताना तो नेहमी अशा कोपऱ्यात ठेवावा जिथे तो कोणालाही सहजासहजी दिसणार नाही. तसेच, जर झाडू खराब झाला असेल किंवा तुटला असेल, तर तो लगेच बदलून टाकावा. तुटलेला झाडू वापरणे टाळावे. झाडू ही एक साधी वस्तू वाटत असली, तरी तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यात तिची मोठी भूमिका असते.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
