वास्तुशास्त्रानुसार घड्याळे आणि दिशांचा थेट संबंध - वास्तुशास्त्रानुसार, घरातील प्रत्येक दिशेचे स्वतःचे गुणधर्म आहेत आणि या गुणांवर आधारित वस्तू तुमच्या जीवनावर परिणाम करतात. घड्याळ प्रभावशाली वस्तू असून ते चोवीस तास कार्यरत असते. त्याचा रंग, आकार आणि दिशा तुमच्या नशिबाशी संबधित असते.
उत्तर दिशा - ही दिशा संधी आणि प्रगतीची मानली जाते. नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील, तर उत्तर दिशेला निळ्या, पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचे गोल किंवा अंडाकार घड्याळ लावा. यामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. मात्र, या दिशेला लावलेले लाल किंवा पिवळ्या रंगाचे घड्याळ संधी रोखू शकते.
advertisement
ईशान्य दिशा - ही दिशा आरोग्य आणि शांतीशी संबंधित आहे. घरात कोणी आजारी असेल, तर या दिशेला गोल, हलक्या रंगाचे घड्याळ लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि हळूहळू आरोग्यात सुधारणा होते. या दिशेला जड किंवा लाल रंगाचे घड्याळ ठेवू नये, कारण त्याचा मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पूर्व दिशा - ही दिशा नातेसंबंध, नाव आणि प्रसिद्धीशी संबंधित आहे. तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनात प्रगती करायची असेल किंवा लोकांशी तुमचे संबंध वाढवायचे असतील, तर सोनेरी, हिरव्या किंवा लाकडी रंगाचे आयताकृती किंवा चौकोनी आकाराचे घड्याळ लावा. यामुळे नातेसंबंध सुधारतात आणि लोक तुम्हाला आदर देऊ लागतात. या दिशेला पांढरे किंवा गोल घड्याळ नकोत.
वर्षाच्या अंतिम टप्प्यात गुरू ग्रहाचं वक्री मार्गक्रमण; 3 राशींना अनपेक्षित लाभ
आग्नेय दिशा - ही दिशा अग्नि तत्त्वाशी आणि पैशाशी संबंधित आहे. जर तुम्हाला घरात किंवा ऑफिसमध्ये पैशाची कमतरता जाणवत असेल, तर या दिशेला लाल किंवा लाकडी रंगाचे चौकोनी किंवा त्रिकोणी घड्याळ ठेवणे फायदेशीर आहे. यामुळे पैशाचा प्रवाह आणि आत्मविश्वास वाढतो. या दिशेला गोल किंवा काळे घड्याळ ठेवू नये.
नैऋत्य दिशा - ही दिशा नातेसंबंध आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. जर घरात संघर्ष किंवा मतभेद वाढत असतील, तर या दिशेला ठेवलेले घड्याळ नक्की पाहा. येथे हिरव्या किंवा राखाडी रंगाचे चौकोनी घड्याळ चांगले आहे. येथे ठेवलेले गोल, पांढरे किंवा काळे घड्याळ नात्यांमध्ये कटुता वाढवू शकते.
पश्चिम दिशा - ही दिशा ज्ञान आणि भविष्याशी संबंधित आहे. मुले अभ्यासात लक्ष देत नसतील किंवा त्यांचे मन लागत नसेल तर पश्चिम दिशेला गोल पांढरे घड्याळ ठेवणे फायदेशीर आहे. त्यानं एकाग्रता वाढते. येथे चौकोनी किंवा त्रिकोणी घड्याळ ठेवणे टाळा.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
