घराचे सांडपाणी बाहेर पडण्याची दिशा -
घराचे सांडपाणी तसेच इतर पाणी बाहेर पडण्यासाठी उतार नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. घराच्या छताचा उतार ईशान्य दिशेला असणे देखील फायदेशीर मानले जाते कारण पाऊस पडतो तेव्हा पाणी नेहमीच उत्तर किंवा पूर्व दिशेने वाहत राहावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतात. याशिवाय घरातील गटार नेहमी झाकलेले असावे.
advertisement
दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार
सांडपाणी बाहेर पडण्याची दिशा ही नसावी -
घरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा किंवा सांडपाण्याचा उतार कोणत्याही परिस्थितीत नैऋत्येकडे नसावा. याचा परिणाम घरातील लोकांच्या आरोग्यावर होतो आणि लोक सतत आजारी पडू शकतात. सांडपाण्याची व्यवस्था पश्चिम दिशेला असेल तर त्याला मुलांशी संबंधित समस्या येऊ शकतात आणि जर ती दक्षिण दिशेला असेल तर त्यामुळे संपत्तीचा नाश होतो. घरातील शांती देखील संपते, असे मानले जाते.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)