झोपताना आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी आपल्या विचारांवर, झोपेवर आणि मनावर परिणाम करतात, असे सांगितले जाते. घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी सतत चालत राहते आणि तिची ऊर्जा आपल्या मेंदूवर परिणाम करू शकते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्या मते, उशाशी घड्याळ ठेवून झोपल्यामुळं काही अडचणी निर्माण होऊ शकतात, त्याविषयी जाणून घेऊया.
advertisement
डोक्याजवळ ठेवलेल्या घड्याळाची सतत होणारी हालचाल आणि त्याचा आवाज मेंदूला पूर्णपणे विश्रांती घेऊ देत नाही. झोपण्याच्या वेळी शरीराला शांततेची गरज असते, पण घड्याळाच्या अस्तित्वामुळं मेंदू सतर्क राहतो. याचा परिणाम असा होतो की झोप वारंवार मोडते आणि गाढ झोप लागत नाही. दीर्घकाळ असं घडल्यास थकवा, चिडचिडेपणा आणि निद्रानाशाचा त्रास वाढू शकतो.
वाईट स्वप्ने - झोपताना आपलं मन सर्वात जास्त संवेदनशील असतं. उशाशी ठेवलेल्या घड्याळाची सतत चालणारी ऊर्जा मनाच्या शांत प्रवाहात अडचण आणू शकते. अनेक लोकांना यामुळे अस्वस्थता, भीतीदायक स्वप्ने किंवा झोपेतून अचानक जाग येण्याची समस्या होते. वारंवार वेळ पाहण्याची सवय देखील मेंदूला तणावात ठेवते, ज्यामुळे स्वप्नांची गुणवत्ता खराब होऊ शकते.
20 वर्षांपासून कॉर्नरवरील घरात राहायचे सुनिल, दक्षिण-नैऋत्य एंट्रीमुळे काय झालं?
मानसिक दबाव - रात्री जेव्हा जेव्हा डोळे उघडतात आणि समोर घड्याळ दिसतं, तेव्हा मनात अशी चिंता निर्माण होते, आपली झोप पूर्ण होत नाहीये. यामुळे मेंदूवर दबाव येतो आणि अस्वस्थता वाढते. हळूहळू ही सवय तणाव, भीती आणि दिवसभर सुस्तीचं कारण बनू शकते. चांगली झोप न मिळाल्यानं विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील खराब होते.
नात्यांवर परिणाम - नीट झोप मिळत नसल्याचा थेट परिणाम तुमच्या वागण्यावर होतो. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही थकलेले असतात, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणं स्वाभाविक आहे. याचा परिणाम तुमच्या वैवाहिक आणि कौटुंबिक नात्यांवरही होऊ शकतो. वास्तुशास्त्र मानणाऱ्या लोकांच्या मते, बेडरुममध्ये झोपेत विघ्न आणणाऱ्या गोष्टी नसाव्या.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
