Vastu Tips: 20 वर्षांपासून कॉर्नरवरील घरात राहायचे सुनिल, पण दक्षिण-नैऋत्य एंट्रीमुळे काय झालं?

Last Updated:

Corner House Vastu: घर खरेदी करताना लोक कित्येक गोष्टी पाहतात. घर कोपऱ्यावरील (कॉर्नरचं) असल्यास लोकांना अनेक प्रश्न पडतात, कॉर्नरच्या प्रॉपर्टीबद्दल लोकांमध्ये संभ्रम असतो. कोणी म्हणतं असं घर अजिबात घेऊ नका, तर कोणी सांगतं की योग्य उपाय केले तर अडचण येत नाही.

News18
News18
मुंबई : अडचणींचे कारण सापडत नसेल तर लोक मग वास्तुशास्त्र-ज्योतिष या गोष्टीही तपासून पाहतात. घर खरेदी करताना लोक कित्येक गोष्टी पाहतात. घर कोपऱ्यावरील (कॉर्नरचं) असल्यास लोकांना अनेक प्रश्न पडतात, कॉर्नरच्या प्रॉपर्टीबद्दल लोकांमध्ये संभ्रम असतो. कोणी म्हणतं असं घर अजिबात घेऊ नका, तर कोणी सांगतं की योग्य उपाय केले तर अडचण येत नाही. घरात दक्षिण (साऊथ), दक्षिण-पश्चिम (साऊथ-वेस्ट) किंवा दक्षिण-दक्षिण पश्चिम (साऊथ-साऊथ वेस्ट) कडून प्रवेशद्वार असेल तेव्हा चिंता वाढते. वास्तुतज्ज्ञ हिमाचल सिंह या विषयावर त्यांच्या अनुभवावरून सविस्तर माहिती देत आहेत. सुनिल हे नाव काल्पनिक आहे.
वास्तुशास्त्रानुसार कॉर्नरचं घर दोन दिशांनी खुलं असतं. याचा अर्थ असा की ऊर्जा तिथून जास्त वेगाने येते आणि जाते. जर दिशा योग्य असतील तर याचा फायदा होतो, पण जर प्रवेश दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडून असेल, तर हीच ऊर्जा नुकसान करू लागते. कॉर्नरवर खांब किंवा जड वस्तू असेल तर ताण अधिक वाढतो, ज्याचा परिणाम घरातील लोकांच्या आर्थिक आणि मानसिक स्थितीवर होऊ शकतो.
advertisement
ज्या घरांमध्ये नैऋत्य (साऊथ-वेस्ट) दार असल्यास ते जास्त करून बंद ठेवावं. कारण ही दिशा जितकी कमी उघडली जाईल तितकं चांगलं मानलं जातं. मात्र, दक्षिण-दक्षिण पश्चिम प्रवेशद्वाराचा वापर जर रोज होत असेल, तर अडचणी तिथूनच सुरू होतात. या दिशेच्या वापरामुळे कर्ज वाढणे, पैसे अडकणे, कामात अडचणी आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्या वारंवार समोर येतात. उत्तर (नॉर्थ) दिशेला प्रवेशद्वार असणं सकारात्मक आहे, पण त्याचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा इतर चुकीची प्रवेशद्वारे बंद असतील.
advertisement
असं घर राहण्यायोग्य आहे का?
जर तुम्ही 15-20 वर्षं अशा कॉर्नरच्या घरात राहण्याचा विचार करत असाल, तर वास्तूनुसार असं घर टाळणंच श्रेयस्कर मानलं जातं. पण जर काही कारणास्तव 3, 5 किंवा 7 वर्षांसाठी राहायचं असेल, तर योग्य उपायांसह राहता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण-दक्षिण पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम ही दोन्ही प्रवेशद्वारे पूर्णपणे बंद ठेवावीत. पश्चिम किंवा पश्चिम-दक्षिण पश्चिमकडून प्रवेश असेल तर तो बऱ्याच अंशी संतुलन राखण्यास मदत करतो.
advertisement
वास्तु उपायांनी किती दिलासा मिळू शकतो?
कॉर्नरची प्रॉपर्टी पूर्णपणे दोषमुक्त करणं कठीण असतं, पण नुकसान नक्कीच कमी करता येतं. योग्य दिशांचा वापर, चुकीचे गेट बंद ठेवणं आणि कोपऱ्यावर जडपणा वाढवणं या गोष्टींमुळे वाईट परिणाम कमी होतात. तरीही, जर कर्जाची समस्या सतत सतावत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
advertisement
कॉर्नरचं घर कधी टाळलेलं चांगलं?
जर घरात दक्षिण-दक्षिण पश्चिम प्रवेशद्वार सक्रिय असेल, कोपऱ्यावर विजेचा खांब असेल आणि सोबतच आर्थिक समस्या सुरू असतील, तर असं घर बदलण्याचा विचार करणं शहाणपणाचं ठरतं. अनेकदा जागेपेक्षा दिशा जास्त नुकसान पोहचवतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: 20 वर्षांपासून कॉर्नरवरील घरात राहायचे सुनिल, पण दक्षिण-नैऋत्य एंट्रीमुळे काय झालं?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement