TRENDING:

Vrishchik Sankranti 2025: आता सूर्याची वृश्चिक संक्रांती! तुमच्या राशीनुसार दान केलेल्या या गोष्टी शुभफळ देतील

Last Updated:

Vrishchik Sankranti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा दर महिन्याला राशी बदलतो, तेव्हा त्याची संक्राती असते. कोणत्या राशीत सूर्य जातो त्या राशीचे नाव त्या महिन्यात संक्रातीला दिलं जातं. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे ही वृश्चिक संक्राती असेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मकर संक्रातीविषयी जवळपास सर्वांना माहिती आहे. पण वृश्चिक संकांती अनेकांना कदाचित माहीत नसेल, खरंतर ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा दर महिन्याला राशी बदलतो, तेव्हा त्याची संक्राती असते. कोणत्या राशीत सूर्य जातो त्या राशीचे नाव त्या महिन्यात संक्रातीला दिलं जातं. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे ही वृश्चिक संक्राती असेल.
News18
News18
advertisement

16 नोव्हेंबर 2025 रोजी सूर्य तूळ राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल, ती वृश्चिक संक्रांती असेल. वृश्चिक संक्रांतीला नदीत स्नान करून सूर्याची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने शुभ फळे मिळतात, व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुधारते, शारीरिक ऊर्जा वाढते. आज आपण वृश्चिक संक्रांतीला राशीनुसार काय दान करावं जाणून घेऊ.

advertisement

मेष - वृश्चिक संक्रांतीला मेष राशीच्या लोकांनी गहू, हरभरा इत्यादी दान करावं. यामुळे जीवनात प्रगती साधता येते, दान करणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. चादर आणि तीळ देखील दान करू शकता.

वृषभ - वृश्चिक संक्रांतीला वृषभ राशीच्या लोकांनी मंदिरात पूजा साहित्य दान करावे. पांढरे कपडे दान करणे देखील शुभ, मानसिक ताण कमी होईल.

advertisement

मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीला हिरवे कपडे आणि हिरवे धान्य दान करावे. हिरवी चादर दान करणे देखील शुभ मानले जाते. कामात कोणत्याही अडचणीविना प्रगती मिळते.

कर्क - कर्क राशीच्या लोकांना शत्रू त्रास देत असतील तर संक्रांतीला साखर, साबुदाणा आणि पांढरे कपडे दान करावेत. जेणेकरून चंद्राचे दुष्परिणाम दूर होतील आणि शंकराचे आशीर्वाद मिळतील.

advertisement

सिंह - सिंह राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीला पिवळ्या रंगाच्या ब्लँकेट किंवा कपडे दान करावेत. त्यामुळे सूर्य देवाचे आशीर्वाद मिळतील. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल.

कन्या - कन्या राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीला हिरवे कपडे आणि उडीद डाळ दान करणे शुभ ठरेल. यामुळे नशिबाची साथ मिळू शकते.

तूळ - तूळ राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीला पांढरे कपडे, कापूस, मोहरी इत्यादी दान करावेत. यामुळे कुटुंबात शांती वाढेल आणि वैवाहिक कलह दूर होतील.

advertisement

वृश्चिक -

वृश्चिक राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीला उबदार कपडे दान करावेत. यामुळे चांगले आरोग्य मिळेल. खिचडी दान केल्यानेही शुभ परिणाम मिळतात.

भाग्योदयासाठी नोव्हेंबरची 23 तारीख फिक्स! शुक्र-बुधाची स्थिती या राशींना लकी

धनु -

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी धनु राशीच्या लोकांनी तांदूळ, हरभरा डाळ अशा वस्तू दान कराव्यात. अशा दानांमुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.

मकर -

मकर राशीच्या लोकांनी वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि काळे ब्लँकेट दान करावे. यामुळे ग्रहांना शांती मिळते, इच्छा पूर्ण होतात.

कुंभ -

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी काळे ब्लँकेट, साबण, कपडे, कंगवा आणि अन्न दान करावे. यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात.

मीन -

वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी गूळ दान करणे मीन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. या दिवशी साबुदाणा, ब्लँकेट, सुती कपडे आणि चादर दान केल्यानं आदर वाढतो.

भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
24 वर्षाच्या तरुणाची कमाल, 4 हजार पुस्तकांसह सुरू केला बुक कॅफे, काय आहे खास?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vrishchik Sankranti 2025: आता सूर्याची वृश्चिक संक्रांती! तुमच्या राशीनुसार दान केलेल्या या गोष्टी शुभफळ देतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल