Astrology: भाग्योदयासाठी नोव्हेंबरची 23 तारीख फिक्स! शुक्र-बुधाची स्थिती या राशींचा कायापालट करेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Marathi Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे राशीपरिवर्तन ठराविक काळानंतर होत असते, ग्रह रास आणि नक्षत्र बदलून शुभ-अशुभ योग तयार करतात, त्याचा राशीचक्रावर सरळ परिणाम दिसून येतो. एकाचवेळी एकाहून अधिक ग्रहांची चाल बदलल्यास त्याचा होणारा परिणाम अधिक प्रभावी जाणवतो. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असाच एक संयोग जुळून येत आहे.
advertisement
मेष -मेष राशीच्या लोकांना या युतीचा लाभ होणार आहे. या ग्रहांची युती तुमच्या जीवनात नवीन आशा आणि सकारात्मक परिणाम देईल. दीर्घकाळ अडकून पडलेली कामं आता गती घेतील. वैवाहिक समज आणि प्रेम वाढेल, रिलेशन अगदी छान होतील. हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल, नवीन गुंतवणूक आणि करारांमुळे आपली आर्थिक परिस्थिती भक्कम होईल.
advertisement
तूळ - शुभ योगाचा परिणाम तूळ राशीच्या लोकांवर चांगला होईल. तूळ राशीसाठी ही ग्रहांची युती अत्यंत शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामावर नवीन भूमिका आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. विद्यार्थी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करतील. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. मालमत्ता गुंतवणूक फायदेशीर ठरेल, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबात आनंद आणि सुसंवादाचे वातावरण राहील.
advertisement
कुंभ - कुंभ राशीसाठी शुक्र आणि बुधाची ही युती शुभ ठरेल. जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. आतापर्यंत रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला एक विश्वासार्ह व्यावसायिक भागीदार मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या जोडीनं तुम्हाला खूप चांगला नफा मिळू शकतो. करिअरच्या नवीन संधी निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल, ज्यामुळे समाधान आणि आनंद मिळेल.
advertisement
नेमकी युती अशी - पंचांगानुसार, शुक्रानं 2 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत प्रवेश केलाय, 6 नोव्हेंबरपर्यंत तिथेच राहील. दरम्यान, ग्रहांचा राजकुमार बुध देखील 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:58 वाजता तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे 23 नोव्हेंबर रोजी तूळ राशीत शुक्र आणि बुध यांच्यात विशेष संयोग होईल, ज्यामुळे लक्ष्मी -नारायण योग जुळून येईल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)


