TRENDING:

Turtle Ring Benefits: कासवछाप अंगठी बोटात धारण करण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल; राशीनुसार कशी घालावी

Last Updated:

Astrological Significance Turtle Rings: कासवाची अंगठी घालणाऱ्या व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळतं, आर्थिक समस्या दूर होतात. कासवाला शांती आणि सहनशीलतेचे प्रतीक मानले जाते, ही अंगठी घालणाऱ्या व्यक्तीला अधिक संयम आणि जीवनात शांती मिळते. कासवाची अंगठी घातल्यानं पैशाशी संबंधित समस्या...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कासवाची अंगठी (कासवछाप) घालणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक लोक कासवाची अंगठी घालतात. पण तुम्हाला माहिती आहे का, कधीकधी ही कासवाची अंगठी घालणाऱ्या व्यक्तीवर विपरीत परिणाम करू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालण्याचे काही खास नियम आहेत आणि जर हे नियम लक्षात ठेवून अंगठी घातली तर त्याचे प्रचंड फायदे होतात. आपल्यापैकी बरेच फार माहिती न घेता कासवाची अंगठी खरेदी करून घालतात. पण, कासवाची अंगठी घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

कासवाची अंगठी घालण्याचे फायदे

ज्योतिषशास्त्रात, कासवाला खूप भाग्यवान मानले जाते. कासव जीवनात आनंद, समृद्धी, संपत्ती आणि सौभाग्य आणते. ज्योतिषी सांगतात, कासवाची अंगठी देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, अंगठी योग्य वेळ पाहून घातली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच राहतो. वास्तु आणि ज्योतिषशास्त्र दोन्हीमध्ये कासवाची अंगठी शुभ मानली जाते, परंतु ती घालण्याची पद्धत आणि नियम काळजीपूर्वक पाळणे खूप महत्वाचे आहे.

advertisement

कासवाची अंगठी घालणाऱ्या व्यक्तीला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळेल आणि आर्थिक समस्याही दूर होतील. कासवाला शांती आणि सहनशीलतेचे प्रतीक मानले जाते, ही अंगठी घालणाऱ्या व्यक्तीला अधिक संयम आणि जीवनात शांती मिळते. ही अंगठी घातल्यानं पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि नोकरी आणि व्यवसायातही यश मिळेल.

कासवाची अंगठी अशी घाला - ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घालताना त्याचा चेहरा नेहमी तुमच्याकडे असावा. तरच पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल, आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल. कासवाचे तोंड बाहेरच्या दिशेला असेल तर पैसा पाण्यासारखा निघून जातो. शास्त्रांमध्ये फक्त चांदीच्या कासवाच्या अंगठीला मान्यता देण्यात आली आहे, ती चंद्र, बुध आणि लक्ष्मीचे प्रतिक मानली जाते.

advertisement

काढल्यानंतर, ती पुन्हा अशा प्रकारेच बोटात घालावी - कासवाची अंगठी काढल्यानंतर पुन्हा घालण्याचे काही नियम आहेत. ही अंगठी कुठेही ठेवू नये. अंगठी काढल्यानंतर, देव्हाऱ्यात देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवावी लागते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. नंतर ती अंगठी दुधाने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि नंतर ती देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि नंतर बोटात घाला. अंगठी धारण केल्यानंतर ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्म्यै नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा.

advertisement

दृष्ट लागल्यासारखी अचानक संकटे! वक्री झालेला बुध या राशींना भयंकर त्रास देणार

या दिवशी कासवाची अंगठी घाला -

कासवाची अंगठी फक्त उजव्या हाताच्या मधल्या बोटावरच घालता येते. शुक्रवारी शुभ मुहूर्तावर अंगठी घालणे शुभ मानले जाते. शुक्रवारी शुभ मुहूर्तावर ती धारण केल्याने संपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही राहतो.

advertisement

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कासवाची अंगठी घालू नये या राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घातली तर ते ग्रह दोषांचे बळी ठरू शकतात आणि नुकसान सहन करावे लागू शकते. सिंह आणि तूळ राशीच्या लोकांनी त्यांची कुंडली पाहिल्यानंतरच कासवाची अंगठी घालावी.

बाजारातून विकत घेतलेली कासवाची अंगठी शुद्ध न करता घालणे अशुभ आहे. घालण्यापूर्वी गंगाजल, दूध, शुद्ध पाणी, मध, तूप इत्यादी पंचामृताने अंगठी शुद्ध करा. नंतर तिला धूप आणि दिवा दाखवा आणि लक्ष्मी मंत्र किंवा कासवाच्या बीज मंत्राने अभिषेक करा.

शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Turtle Ring Benefits: कासवछाप अंगठी बोटात धारण करण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल; राशीनुसार कशी घालावी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल