TRENDING:

आता EV गाडीचं घ्या! बिनधास्त फिरा 1000 किमी, भारतीय माणसाने बनवली पॉवरफुल बॅटरी!

Last Updated:

रेंज किती असणार ही समस्या मात्र अजूनही कायम आहे. पण अशातच बीएचयूच्या शास्त्रज्ञांनी ई-वाहनांसाठी एक नवीन बॅटरी तयारी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वाराणसी: वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे सध्या ईलेक्ट्रिक वाहनं खरेदीचा कल वाढला आहे. पण इलेक्ट्रिक वाहनं बाजारात उपलब्ध असली तरी रेंज किती असणार ही समस्या मात्र अजूनही कायम आहे. पण अशातच बीएचयूच्या शास्त्रज्ञांनी ई-वाहनांसाठी एक नवीन बॅटरी तयारी केली आहे. जी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक नवीन क्रांतीकारक ठरणार आहे. ही बॅटरी चार्ज करून तुम्ही लांब अंतराचा प्रवास करू शकतात. सध्या, बीएचयूमध्ये दुचाकी वाहनांवर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
News18
News18
advertisement

लवकरच, इलेक्ट्रिक वाहनांमध्ये लिथियम बॅटरीऐवजी टेम्परेचर सोडियम आयन बॅटरी वापरल्या जातील. जी एकदा चार्ज केल्यानंतर एक हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. हे बीएचयूचे भौतिकशास्त्र प्राध्यापक राजेंद्र कुमार सिंह आणि त्यांच्या टीममधील संशोधन विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. सध्या, सायकलवर चाचणी घेतली जात आहे.

advertisement

सध्या या बॅटरीची चार्जिंग सुरू आहे. चाचणीसाठी ही बॅटरी सायकलमध्ये बसवण्यात आली आहे. ज्यामध्ये पूर्ण चार्ज झाल्यानंतर, ही इलेक्ट्रिक सायकल सरासरी हजार किलोमीटर चालवत आहे. ही बॅटरी तयार करण्यासाठी संशोधकांनी औद्योगिक कचऱ्यामध्ये आढळणाऱ्या सल्फरची मदत घेतली आहे, जी लिथियम बॅटरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली आहे. हे संशोधन २ वर्षांत पूर्ण होणार आहे, अशी माहिती प्राध्यापक राजेंद्र कुमार सिंह यांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शोरमा विकून महिन्याला किती कमाई होऊ शकते? प्रणयचं इन्कम पाहून तुम्ही कराल कौतुक!
सर्व पहा

'हे संशोधन पूर्ण करण्यासाठी २ वर्षे लागतील. ज्यासाठी ऊर्जा मंत्रालयाची कंपनी असलेल्या सेंट्रल पॉवर ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट, बंगळुरूसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. संशोधन पूर्ण झाल्यानंतर, ही बॅटरी मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल जी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती आणेल' असा विश्वास राजेंद्र कुमार सिंह यांनी व्यक्त केला.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
आता EV गाडीचं घ्या! बिनधास्त फिरा 1000 किमी, भारतीय माणसाने बनवली पॉवरफुल बॅटरी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल