2023 Tata Harrier/Safari
2023 Tata Harrier आणि Tata Safari फेसलिफ्ट्स आता भारतातील सर्वात सुरक्षित कारच्या यादीत सामील झाल्या आहेत. या दोन्ही गाड्यांना GNCAP कडून अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (AOP) आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (COP) या दोन्हीमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. या दोन्ही SUV मधील सामान्य सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर मानक आहेत. याशिवाय, हिल असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी वैशिष्ट्ये देखील त्यांच्यामध्ये उपलब्ध आहेत. 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. तर, 2023 च्या टाटा सफारी फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 16.19 लाख रुपये आहे.
advertisement
Toyota ची ही कार आहे बेस्ट! 27.97 kmpl मायलेज, 6 एअरबॅग, किंमत फक्त 11 लाख
Volkswagen Virtus/Skoda Slavia
Volkswagen Virtus ची सुरुवातीची किंमत 11.48 लाख रुपये आहे. तर, स्कोडा स्लाव्हियाची सुरुवातीची किंमत 10.89 लाख रुपये आहे. या दोन्ही कार भारतातील सर्वात सुरक्षित कारमध्ये गणल्या जातात. यात प्रौढ आणि बालक दोघांच्या सुरक्षिततेसाठी 5-स्टार सुरक्षा रेटिंग आहे. या दोन्ही सेडान MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत. त्यांच्या स्टँडर्ड सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे तर त्यात ड्युअल-फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड असिस्ट, 3-पॉइंट सीटबेल्ट आणि सीटबेल्ट रिमाइंडर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
Volkswagen Taigun/Skoda Kushaq
भारतात Volkswagen Taigun ची सुरुवातीची किंमत 11.62 लाख रुपये आहे. तर, Skoda Kushaq ची सुरुवातीची किंमत 10.89 लाख रुपये आहे. या दोन्ही कारना ग्लोबल NCAP कडून प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पूर्ण 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. या गाड्या देखील MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर तयार केल्या आहेत. सुरक्षेसाठी, या दोन्हीमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), EBD सह ABS आणि 3-पॉइंट सीटबेल्ट यासारखी वैशिष्ट्यं आहेत.
cars : वर्ष संपणार आणि या गाड्या घेणार मार्केटचा निरोप, यात तुमची आवडती कार तर नाही ना?
Hyundai Verna
Hyundai Verna भारतात 10.90 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येते. ही कार लहान मुलांसाठी आणि प्रौढांच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण 5-स्टार रेटिंगसह येते. कारच्या सुरक्षेच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), EBD सह ABS, 3 पॉइंट सीटबेल्ट आणि ब्लाइंड स्पॉट अलर्ट यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.