Toyota ची ही कार आहे बेस्ट! 27.97 kmpl मायलेज, 6 एअरबॅग, किंमत फक्त 11 लाख

Last Updated:

Toyota Hyryder Hybrid SUV: बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या हायब्रिड कारची मागणी भारतात वाढतेय. अशा परिस्थितीत त्यांना खरेदी करण्यासाठी वेटिंग पीरियड देखील वाढतोय. काही कारसाठी वेटिंग पीरियड 6 महिन्यांपासून 1 वर्षांपर्यंत पोहोचलाय.

 टोयोटो एसयूव्ही
टोयोटो एसयूव्ही
नवी दिल्ली : भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये पेट्रोल आणि सीएनजी एसयूव्ही नंतर हायब्रीड एसयूव्हीचा ट्रेंड वाढलाय. हायब्रीड कार या इंधनाची बचत करतात यासोबतच पर्यावरणाला कमी हानी पोहोचवतात. भारतात 11-12 लाख रुपयांच्या बजेटमध्ये हायब्रीड कार मिळत आहेत. यापैकी काही कारची मागणी प्रचंड आहे. त्यामुळे ग्राहकांना त्या खरेदीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते. टोयोटाने आपली हायब्रीड SUV अर्बन क्रूझर Hyrider गेल्या वर्षीच भारतीय बाजारात लॉन्च केली होती. टोयोटाच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार, या एसयूव्हीसाठी 5-6 महिन्यांचा वेटिंग पीरियड सुरु आहे. म्हणजेच आजच ही SUV बुक केली तर 5 ते 6 महिन्यांनी शोरूममधून डिलिव्हरी केली जाईल.
भारतीय बाजारपेठेत, टोयोटा अर्बन क्रूझर Hayrider थेट मारुती सुझुकी ग्रँड विटाराशी स्पर्धा करते. Hayrider त्याच्या विभागातील लेटेस्ट डिझाइन आणि फीचर्ससह येते. हायब्रीड इंजिन त्याच्या उत्कृष्ट मायलेजमुळे लोकांना आवडते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या एसयूव्हीच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये 27.97 kmpl पर्यंत मायलेज मिळते. तुम्ही देखील हायब्रिड एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Hayrider ही तुमची पहिली पसंती असू शकते. या SUV मध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.
advertisement
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरचं इंजिन
ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही दोन पेट्रोल पॉवरट्रेन ऑप्शनसह येते. ज्यामध्ये 1.5-लीटर माइल्ड-हायब्रिड इंजिन आणि 1.5-लीटर स्ट्राँग-हायब्रिड इंजिनचा समावेश आहे. ही SUV पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरट्रेनवरही चालण्यास सक्षम आहे. त्याचे माइल्ड हायब्रिड इंजिन 103 bhp ची पॉवर जनरेट करते तर स्ट्राँग हायब्रिड इंजिन 116 bhp ची पॉवर जनरेट करते. कंपनी या एसयूव्हीमध्ये फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि ऑल व्हील ड्राइव्ह दोन्ही प्रकारचे कॉन्फिगरेशन ऑफर करते. यासोबतच, ऑल-व्हील ड्राइव्ह केवळ मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. माइल्ड हायब्रिड इंजिनसोबतच सीएनजीचा ऑप्शनही उपलब्ध आहे. जो 26.6km/kg चा मायलेज ऑफर करतो.
advertisement
टोयोटा अर्बन क्रूझर Hayrider चे फीचर्स
फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, टोयोटा अर्बन क्रूझर Hayrider मध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, व्हेटिलेटेड फ्रंट सीट्स, स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी, अ‍ॅम्बियंट लायटिंग, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखे फीचर्स आहेत.
advertisement
सेफ्टी लक्षात घेता, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), ऑल-व्हील डिस्क ब्रेक आणि 360-डिग्री कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर आहे. कंपनी आपल्या बॅटरीवर 8 वर्षांची स्टँडर्ड वॉरंटी देते.
टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडरची किंमत
Toyota Urban Cruiser Hayrider ची एक्स-शोरूम किंमत 10.86 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20 लाखांपर्यंत जाते. कंपनी ही मिड-साइज SUV चार व्हेरिएंट्स E, S, G आणि V मध्ये विकतेय. या 5-सीटर एसयूव्हीमध्ये कंफर्ट आणि जागेची कमतरता भासणार नाही. या कारमध्ये लावलेल्या बॅटरीवर कंपनी 8 वर्षांची वॉरंटी देते. ही कार भारतीय बाजारपेठेत मारुती ग्रँड विटारा, किया सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा आणि होंडा एलिव्हेट सारख्या वाहनांशी स्पर्धा करते.
मराठी बातम्या/ऑटो/
Toyota ची ही कार आहे बेस्ट! 27.97 kmpl मायलेज, 6 एअरबॅग, किंमत फक्त 11 लाख
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement