पांढरा की पिवळा? दाट धुक्यातून प्रवास करताना गाडीवर कोणता हेडलाईट असावा?

Last Updated:

धुक्यातून प्रवास करत असाल तर कारचे हेडलाइट अत्यंत सक्षम असणं गरजेचं आहे.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली, 29 डिसेंबर : हिवाळ्यामुळे प्रामुख्याने सकाळच्या वेळी धुक्याचं साम्राज्य असतं. सध्या उत्तर भारतात तीव्र धुकं पाहायला मिळत आहे. साहजिकच त्यामुळे रस्त्यावरची दृश्यमानता कमालीची घटली आहे. दाट धुक्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत उत्तर भारतातल्या महामार्गांवर धुक्यामुळे अपघात होत आहेत. अशा स्थितीत कोणत्याही कारणासाठी धुक्यातून प्रवास करत असाल तर कारचे हेडलाइट अत्यंत सक्षम असणं गरजेचं आहे.
धुक्यातून प्रवास करताना कारचे हेडलाइट उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता कमी होते; पण धुक्यातून प्रवास करताना कारचे हेडलाइट पांढरे असावेत की पिवळे असा प्रश्न काही जणांच्या मनात निर्माण होतो. या प्रश्नाचं नेमकं उत्तर जाणून घेऊया.
advertisement
सध्या उत्तर भारतात थंडीची लाट असून धुक्याचं साम्राज्य पसरलं आहे. दाट धुक्यातून गाडी चालवणं अवघड जातं. धुक्यातून गाडी चालवताना अपघात टाळण्यासाठी योग्य रंगाचा हेडलाइट गरजेचा असतो. गाडीला पांढऱ्या रंगाचे लाइट असतील तर धुक्यातून प्रवास करताना जास्त काळजी घ्यावी लागते. अनेक कार्सना पिवळ्या रंगाचे लाइट असतात; पण काही कार्सना पांढऱ्या रंगाचे लाइट असतात. पांढऱ्या हेडलाइट्सची वेव्हलेंग्थ कमी असते. त्यामुळे दृश्यमानता कमी होते. त्यामुळे कारला पांढऱ्या रंगाचे लाइट असतील तर धुक्यातून प्रवास करताना काळजी घ्यावी लागते.
advertisement
दुसरीकडे, पिवळ्या रंगाचे फॉग लाइट्स दाट धुक्यातून प्रवास करताना ड्रायव्हरला रस्त्यावरून सावधगिरीने ड्रायव्हिंग करताना सहायक ठरतात. त्यामुळे ड्रायव्हर सुरक्षितपणे गाडी चालवू शकतात. दाट धुक्यात पिवळ्या रंगाचा प्रकाश चांगला असतो. कारण तो रेटिनावर थेट पडतो आणि लगेच दिसतो. त्यामुळे प्रवास करताना रस्त्यावरून लक्ष विचलित होत नाही. तसंच त्याची दृश्यमानता जास्त असते. त्यामुळे दाट धुक्यातून प्रवास करताना गाडीला पिवळ्या रंगाचा लाइट असणं सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पांढऱ्या रंगाच्या लाइटच्या तुलनेत पिवळ्या रंगाचे लाइट धुक्यातून प्रवास करताना जोखीम कमी करतात.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
पांढरा की पिवळा? दाट धुक्यातून प्रवास करताना गाडीवर कोणता हेडलाईट असावा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement